नाशकातील ‘या’ बँकेचा परवानारद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई; खातेधारकांवर काय परिणाम होणार?

नाशकातील 'या' बँकेचा परवानारद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई; खातेधारकांवर काय परिणाम होणार? l Independence Co Operative Bank Licence Cancel by RBI Nashik
नाशकातील 'या' बँकेचा परवानारद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई; खातेधारकांवर काय परिणाम होणार? l Independence Co Operative Bank Licence Cancel by RBI Nashik
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

शहरातील रविवार कारंजा (Ravivar Karanja) परिसरातील प्रसिद्ध इंडिपेंडन्स काे. ऑप. बँकेचा (lndependence Co. Operative Bank Limited Nashik) बँकिंग परवाना अखेर रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India (RBI) रद्द केला असून बँक अवसायानासाठी ताब्यात घेण्याचे आदेश सहकार आयुक्तांना दिल्याने बँकेवर लवकरच अवसायकाची नेमणूक हाेईल.

राजकीय वर्तुळात खळबळ : शिवसेना नगरसेवकासह; नगरसेविकेच्या पतीला थेट तडीपारीची नोटीस

सरकारच्या विमा कंपनीकडून यामुळे किमान पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी ठेवीदारांना परत मिळू शकणार असल्याने ९९ टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून १ टक्के ग्राहकांना मात्र झळ पाेहचेल असे रिझर्व्ह बँकेनेच स्पष्ट केले आहे.

..अखेर डॉ. सुवर्णा वाजे यांची ‘मर्डर मिस्ट्री’ सॉल्व; पतीनेच थंड डोक्याने काटा काढला : ‘असा’ होता संपूर्ण घटनाक्रम

उप वर्षभरापूर्वी दि. ११ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध घालत सहा महिने ठेवी स्वीकारण्यास आणि कर्ज वितरणास बंदी घातली हाेती. निर्बंधांनुसार सहा महिन्यांनंतर आढावा घेवून आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यास हे निर्बंध शिथिल केले जातील असे स्पष्ट केले हाेते.

See also  मालेगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक; तिहेरी अपघातात रिक्षा आणि क्रूझरचा चक्काचूर, तीन जागीच ठार, 9 जखमी

मात्र, तरीही बँकेची आर्थिक स्थिती सुधारू शकली नसल्याने रिझर्व्ह बँकेने अखेर ही कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वारंवार संधी दिली हाेती मात्र संचालक मंडळ काही करू शकले नाही, असे या कारवाईमुळे आता स्पष्ट झाले आहे.

Nashik : ‘शिवशाही’ला भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, अनेक जखमी

बँकेच्या सर्व ९९ टक्के ठेवीदारांच्या ठेवींना डिपॉझिट इन्श्युरन्स डीआयसीजीसीकडे (Deposit Insurance DICGC) पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण असल्याने या ठेवींना कुठलाही धोका नाही.फक्त त्या मिळण्यास थाेडा उशीर हाेवू शकताे. तर बॅँकेने रिझर्व्ह बँकेला सादर केलेल्या आकडेवारीनुसार दि. २७ जानेवारी २०२२ पर्यंत २.३६ काेटी रूपये ग्राहकांना परत दिले आहे.

SMBT कॉलेज बसला भीषण अपघात; २२ हुन अधिक विद्यार्थी जखमी

See also  भावांनो तयारीला लागा! राज्यात 7 हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती; तपशील घ्या जाणून

Share on Social Sites