नाशिक l Nashik :
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या बसला ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात २० ते २५ विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. नाशिक-औरंगाबाद रोडवर (Nashik-Aurangabad highway accident) हा अपघात झाला.
नाशकातील ‘या’ बँकेचा परवानारद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई; खातेधारकांवर काय परिणाम होणार?
प्राप्त माहितीनुसार, नाशिक-औरंगाबाद रोडवर एसएमबीटी महाविद्यालयाच्या (SMBT Institute of Medical Science & Research Centre) बसचा आज (दि. ०४) शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला.
वैद्यकीय महाविद्यालयामधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचार्यांना घेऊन जाणार्या बसला हा अपघात झाला. बस पलटी होऊन झालेल्या या अपघातात २० ते २५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस आणि ट्रक (Bus-Truck) यांच्यात समोरासमोर अपघात झाला आणि त्यानंतर बस पलटली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी खाजगी तसेच पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Nashik : ‘शिवशाही’ला भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, अनेक जखमी