नाशिक l Nashik :
नाशिकहून औरंगाबादच्या दिशेने जाणार्या शिवशाही बसचा शनिवारी (दि. ५) सकाळी तपोवन कॉर्नर येथे अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. (Shivshahi bus Accident in Nashik)
ठक्कर बझार (Thakkar Bazar) येथून सकाळी शिवशाही बस क्रमांक (MH 18 BG 1235) मार्गस्थ झाल्यानंतर सकाळी सात ते साडे सात वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर उड्डाणपुलाखालील खांब नं. ४४ ला जोरदार धडक देत हा अपघात घडला.
बसच्या पुढे दुचाकी चालवत असलेल्या विनोद विठ्ठल दीक्षित, (रा. सुतारवाडा, मखमलाबाद) या दुचाकीस्वाराचा (वाहन क्र. MH 15 FE 6791) घटनेत दुर्देवी मृत्यु झाला.
या घटनेत शिवशाही बसचा चालक ज्ञानेश्वर भिकन सोनवणे (२८, रा. येसगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) हा जखमी झाला असून त्याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Dhule : ‘त्या’ खून प्रकरणात बापासह दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा; शिंदखेडा तालुक्यातील घटना
या अपघातातील श्रीकांत शांताराम पाठक (४७), दत्तात्रय विष्णू पैठणे (६९), प्रसाद अग्रेसर शर्मा (५५), अजीम अहमद (२२), तेजस उपासनी (२२), देवयानी प्रदीप शुक्ला (५१), भास्कर ठाकूर, आत्ता बलम यासह इतर काही जखमींना आडगाव येथील वसंत पवार मेडीकल कॉलेज (Vasant Pawar Medical College, Adgaon) तर काहींना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati police station) रात्री उशीरा पर्यंत सुरू होते. गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी पासून एस. टी. बसेसचा संप सुरू आहे.
सरकारकडून संप काळात केवळ शिवशाही बसेस रस्त्यावर सोडण्यात आल्या होत्या आता सरकारकडून संप मिटल्याची घोषणा करण्यात आल्यानंतरही कर्मचारी कामावर न परतल्याने एसटीची सेवा पुर्ववत झालेली नसून कामावर परतलेले एसटी कर्मचारी आणि बसने प्रवास करणार्या प्रवाशांच्य समस्येत अशा घटनांमुळे भीती निर्माण झाली आहे.
नाशकातील ‘या’ बँकेचा परवानारद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई; खातेधारकांवर काय परिणाम होणार?
बस कधी सुरू होणार?
एकीकडे सरकारने एसटीचा संप मिटल्याची घोषणा केली. मात्र, दुसरीकडे अजूनही बहुसंख्य कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे राज्यभरातील एसटीसेवा विस्कळीत झाली आहे. दीर्घ पल्ल्यासोबत कमी पल्ल्याच्या बहुतांश गाड्या धावताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. जे कर्मचारी कामावर आहेत, त्यांच्यावरही ताण वाढला आहे. नाशिकमध्ये झालेल्या शिवशाही बसचा अपघात याच ताणातून झाला आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. सरकारने लवकरात लवकर एसटीसेवा पूर्ववत करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ : शिवसेना नगरसेवकासह; नगरसेविकेच्या पतीला थेट तडीपारीची नोटीस