मुंबई l Mumbai :
राज्यातील तरुण वर्गासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2022) निघणार आहे.
त्यासाठीच्या हलचाली गृह विभागाकडून (State Home Department) सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस भरतीचा (Maharashtra Police Bharti 2022) मार्ग आखेर मोकळा झाल्याने युवकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात (Covid 19) मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत.
तसेच पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात कष्ट घेत आहेत. आता पर्यंत केलेल्या कष्टाचं चीज करण्याची हि संधी आहे. विविध कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती ही झाली नव्हती. त्यामुळे अनेकांना या संधीची प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.
प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी लागू शकतो दहावी आणि बारावीचा निकाल; बोर्डाने केले स्पष्ट



