धुळे l Dhule :
मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात (Major accident on Mumbai Agra Highway in Dhule) झाला आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला (3 Killed on the spot in accident) आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर (Mitra Nagar Dhule district) जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर्दैवी घटना
धुळे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रक, ॲपे रिक्षा आणि क्रूझर गाड्या एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.
यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; महाराष्ट्रातील पाचजण जागीच ठार, 2 गंभीर
