
नाशिक । Nashik :
शहरात महापालिका निवडणूकांची धामधूम (Nashik Municipal Corporation Election 2022) सुरू होत असताना नवीन नाशिक परिसरातील (New Nashik) शिवसेना नगरसेवक (Shivs ena Corporator) व महिला नगरसेविकेच्या पतीला शहर पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. सदर नोटीसीला दोघांना येत्या दि. ९ फेब्रुवारीपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नाशकातील ‘या’ बँकेचा परवानारद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई; खातेधारकांवर काय परिणाम होणार?
एका केंद्रीय मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक (Shivsena Corporator) आणि युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर (Yuva Sena district chief Deepak Datir) व नगरसेविका किरण दराडे (Corporator Kiran Darade) यांचे पती बाळा दराडे (Bala Darade) यांनी भाजप कार्यालयावर (BJP) दगडफेक केली होती.
याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) दोघांवर कारवाई केली होती. याच पार्श्वभूमीवर दोघांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.
Nashik : ‘शिवशाही’ला भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, अनेक जखमी