वा रे वा नाशिक पोलिस! थेट पोलिस चौकीतच रंगली ‘ओली पार्टी’; Video काढणाऱ्यांना चोप

वा रे वा नाशिक पोलिस ! थेट पोलिस चौकीतच रंगली 'ओली पार्टी'; Video काढणाऱ्यांना चोप l Nashik Police Alcohol Party held in police Chowki Nasik
वा रे वा नाशिक पोलिस ! थेट पोलिस चौकीतच रंगली 'ओली पार्टी'; Video काढणाऱ्यांना चोप l Nashik Police Alcohol Party held in police Chowki Nasik
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

मद्यपी त्रास देतात म्हणून तक्रार नोंदवायला गेलेल्या नागरिकाला एका पोलिस चौकीत ओली पार्टी रंगली असल्याचा याची देही, याची डोळा प्रत्यय आल्याने नाशकात एकच खळबळ माजली आहे. (Alcohol party of Police in Nashik)

यासंदर्भातील व्हिडीओत ओळी पार्टी सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, फोटो आणि व्हिडीओ (Alcohol party photo and Video of Police) काढणाऱ्या नागरिकांना मद्यपी पोलिसांनी चक्क मारहाण देखील केली आहे.

पोलीस चौकीतील ओली पार्टी भोवली; ‘ते’ चार मद्यपी पोलीस थेट निलंबित

घटनास्थळी नागरिक जमत असल्याचे लक्षात आल्यानंतर मद्यपी पोलिसांनी तिथून पळ काढला आहे. ही घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत डी. के. नगर पोलीस चौकीत (Dadoji Kondev Police Chowki, Nashik) उघडकीस आली आहे.

Facebook वरून ‘न्युड व्हिडिओ कॉल’ करत ‘सेक्स्टॉर्शन’; खंडणी उकळण्याचा प्रयत्न

दारू पिऊन टवाळखोर त्रास देत असल्याने त्यांची तक्रार करण्यासाठी नागरिक पोलिसांकडे गेले होते. मात्र पोलिसचं दारू पिताना आढळून आल्याने तक्रारदाराला जबर धक्का बसला.

सहकार सुर्य मावळला; माजी मंत्री शंकरराव कोल्हे कालवश

तक्रारदाराने मोबाईल काढून शुटिंग सुरू करताच पोलिसांनी तक्रारदाराला मारहाण देखील केली आहे. सदर घटनेची परिसरात कुणकुण लागताच अनेक नागरिक डी. के. नगर पोलीस चौकी (D K Police Nagar Chowki) समोर जमा झाले होते. वरिष्ठ पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

…आता पाेलिस आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

याप्रकरणी सिंग नामक कर्मचाऱ्यास पाेलिसांनी ताब्यात घेतले. बाकीचे फरार झाले. त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी झाली नाही, तर त्यांच्या पार्टीचा पुरावाच नष्ट हाेण्याचे आव्हान त्यांच्याच विभागातील पाेलिस कर्मचाऱ्यांसमाेर हाेते. स्थानिक रहिवाशांनी घटनेचे फाेटाे आणि व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल केले. (Nashik Police Viral Video) त्यामुळे वातावरण आणखीनच तापले. उपायुक्त अमाेल तांबे (Deputy Commissioner Amal Tambe), सहायक पाेलिस आयुक्त दिपाली खन्ना (Assistant Commissioner of Police Deepali Khanna), गंगापूर राेड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाझ शेख (Gangapur Road Police Station Senior Inspector Riaz Sheikh) यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व संबंधित दाेषींवर कारवाईचे आश्वासन दिल्याने तणाव कमी झाला. आता आज याप्रकरणी पाेलिस आयुक्त दीपक पांडेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey) काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

इगतपुरीतील हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत नको त्या अवस्थेत आढळले 52 तरुण

See also  TET Exam Scam : धक्कादायक! शिक्षक पात्रता परीक्षेत 'महा घोटाळा'; ७ हजार ८०० अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  यशवंत जाधव यांचे ‘मातोश्री’ प्रेम डोळ्यात पाणी आणणारे; २ कोटी, ५० लाखांचे घड्याळ भेट

Share on Social Sites