
दाक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डिक्रूझचा शुक्रवारी एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. (Telugu Actress Gayathri (Dolly D Cruze died) यावेळी गायत्रीसोबत तिचा एक मित्र होता. हे दोघेही होळीच्या पार्टीतून घरी जात होते. यावेळी हा भीषण अपघात झाला आहे.
रिपोर्ट्सनुसार, गायत्रीचा मित्र राठोड कार चालवत होता. तर, हैदराबादच्या गाचीबोवली भागात (Gachibowli, Hyderabad) त्यांच्या कारला अपघात झाला. कार वेगात होती आणि राठोडचे गाडीवर असलेले नियंत्रण सुटले. कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकून गाडी पलटली. हा अपघात इतका भीषण होता की गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. (Gayathri Car Accident Video)
भीषण अपघातात अभिनेत्याचा जागीच मृत्यू; कसा वाचला बाजुलाच बसलेल्या गर्लफ्रेंडचा जीव?
या अपघातात राठोडला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तिथे मृत घोषित केले.
काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कार रस्त्यावर चालत असलेल्या एका महिलेला धडकली. त्यानंतर कार डिव्हायडरला धडकून पलटली. तर कारने ज्या महिलेला धकड दिली ती महिला गाडीच्या खाली सापडली आणि त्या महिलेचा गायत्रीप्रमाणे जागीचा मृत्यू झाला.
https://www.instagram.com/p/CT2JXaUJivi/
गायत्री ही फक्त २६ वर्षांची होती. गायत्री इन्स्टाग्राम (Instagram) आणि यूट्यूबमुळे (YouTube) बरीच चर्चेत असायची. ‘जलसा रायडू’ (Jalsa Rayudu YouTube Channel) असे तिच्या यूट्यूब चॅनलने नाव आहे.
सोशल मीडियावरील वाढत्या लोकप्रियतेनंतरच गायत्रीला ‘मॅडम सर मॅडम अंते’ (Madam Sir Madam Ante Web Series) या वेबसिरीजची ऑफर मिळाली. या वेबसीरिजमुळे गायत्री चांगलीच चर्चेत आली होती. याशिवाय गायत्री उर्फ अनेक शॉर्ट फिल्म्समध्येही दिसली.
Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ… 16 ते 18 वर्षाच्या ‘रिल्स स्टार’ची जिंदगी
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
संतूरचे सूर मुके झाले... पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश
राज्यात चाललंय तरी काय?... धुळ्यानंतर आता 'या' ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलवारींचा ...
Nashik Crime : असा झाला 'त्या' खुनाचा उलगडा; पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला ...
Maharashtra Collages Reopening : ठरलं! शाळांनंतर आता कॉलेज 'या' तारखेपासून पुन्ह...