
मुंबई l Mumbai :
आपण ज्या व्यक्तीवर निस्वार्थपणे प्रेम करतो… त्याचा डोळ्यादेखत मृत्यू पाहिल्यानंतर त्या व्यक्तीची परिस्थिती कशी असेल… या गोष्टीचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही.
काल (दि. १५) मंगळवारी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा (Punjabi actor Deep Sidhu) दिल्ली सीमेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दीप जेव्हा दिल्लीहून पंजाबच्या दिशेने परतत होता तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. (Punjabi actor Deep Sidhu died in an accident near Delhi border)
‘या’ प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण कार अपघातात जागीच मृत्यू
महत्त्वाचे म्हणजे दीपसोबत त्यावेळी गर्लफ्रेंड रीना राय (Reena Rai) देखील होती. अपघातात रिना किरकोळ जखमी झाली आहे. पण अभिनेत्यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे अनेकांनी दीपचा झालेला अपघात एक कट असल्याचा दावा केला आहे.
Bappi Lahiri : बॉलिवूडमधील दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन
प्रजासत्ताक दिन २०२१ (Republic Day 2021) रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर (Red Fort) झालेल्या हिंसाचारप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी दीपचे अनेक राजकारणी पक्षांसोबत वाद असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हा अपघातनसून दीपविरोधात रचलेला कट असल्याचा दावा अभिनेत्याच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.
आता दीप सिद्धूच्या कारचा अपघात नक्की कसा झाला, याप्रकरणी फॉरेन्सिक चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर रीना म्हणाली, ‘जेव्हा अपघात झाला तेव्हा मी झोपली होती, कार आणि ट्रकची धडक झाली तेव्हा जोरदार आवाज झाला…’
‘तेव्हा दीप रक्ताच्या थारोळ्यात पडला… असल्याचे मी पाहिले… अशी माहिती त्याच्या गर्लफ्रेडने दिली आहे… काही दिवसांपूर्वी रीना अमेरिकेतून परतली आहे. तिच्यावर सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सौ बात की एक बात : आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर
काय म्हणाले पोलीस ?
एसपी राहुल शर्मा (SP Rahul Sharma) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धूचे शवविच्छेदन झाल्यानंतर, त्याचं देह कुटुंबाकडे सोपावण्यात आले आहे. शिवाय ट्रक मालक आणि अज्ञात चालका विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाचंचे म्हणजे कारमध्ये पोलिसांच्या हाती दारूची बाटली लागली आहे. त्यामध्ये दारू देखील कमी होती. पण घडलेले प्रकरण ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह (drink and drive) आहे की नाही. यासंदर्भात रिपोर्ट अद्याप आले नसल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
राऊतांचा डोळा ठाकरेंच्या खुर्चीवर, तशी सुपारी मिळाली आहे; राणेंचा गंभीर आरोप