मुंबई l Mumbai (ई खबरबात न्यूज नेटवर्क) :
बाईक रेसिंगची आवड असणाऱ्या तरुणांमध्ये ‘केटीएम बाईक्स’ची विशेष क्रेझ आहे. त्या भारतात खूप पसंत केल्या जातात. (Kronreif and Trunkrnpolz Mattighofen (KTM) कंपनीने अलीकडेच आपल्या आरसी 390 बाईकचं न्यू जनरेशन (New Generation KTM RC 390) मॉडेल लॉन्च केलं आहे. कंपनीने या बाईकला पूर्णपणे नव्या डिझाइनसह लाँच करण्यात आले आहे.
या नवीन बाईकच्या फ्रंट फेअरिंगला एक मोठा एलईडी हेडलॅम्प (LED headlamp) आणि दोन्ही बाजूंना एलईडी डीआरएल इंडिकेटर (LED DRL indicators) देण्यात आले आहेत. नवीन KTM RC 390 : 2022 मॉडेल ट्रॅक्शन कंट्रोल (Traction Control), सुपरमोटो मोडसह (Supermoto mode) लीन अँगल सेन्सिटिव्ह कॉर्नरिंग एबीएस (Lean Angle Sensitive Corning ABS), अँटी-हॉपिंग स्लिपर क्लच (Anti-hopping slipper Clutch) आणि टीएफटी डिस्प्ले (TFT display) या वैशिष्ट्यांसह येते.
Viral Video : कारची चावी कारमध्येच राहिली तर काय करावे… पाहा हा ‘देसी जुगाड’
बाईकला समोर यूएसडी फॉक्स (USD Fox) आणि आरामासाठी मागील बाजूस अॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन (Adjustable Monoshock Suspension) आहे. सर्वोत्तम ब्रेकिंग परफॉर्मन्ससाठी, याला 320mm फ्रंट आणि 280mm रियर डिस्क ब्रेक मिळतो जो ड्युअल चॅनल ABS सह येतो. KTM RC 390 2020 (KTM RC 390) बाइक मॉडेल KTM द्वारे माय राइड नेव्हिगेशन ॲपला (My Ride Navigation app) देखील सपोर्ट करते.
वेश्या व्यवसाय कायदेशीर.. ‘सेक्स वर्कर्स’च्या कामात पोलीसांनी हस्तक्षेप करता कामा नये
