मुंबई l Mumbai :
सध्या राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave in Maharashtra) पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर गोवा (Goa), कोकण किनारपट्टी (Konkan coast) आणि उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) तापमानाचा (Temperature) पारा वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र 17 मार्चनंतरच उन्हाळ्याच्या झळा बसू लागतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
पुढील दोन दिवसांत मुंबईसह (Mumbai) राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईसह इतर उपनगरांतही तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण: येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील व नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता.
-IMD
कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर व कमाल तापमान किमान 37°Cअसावे. pic.twitter.com/0u2vQ2ivLn— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2022
तापमान वाढल्यास मार्च महिन्यात मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. मुंबईसह, पालघर (Palghar), रायगड (Raigad), ठाण्यातही तापमान 42 अंशांपार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K. S. Hosaliakar) यांनी यासंबंधी एक ट्विट करत या संबंधी इशारा दिला आहे. या ट्विटमध्ये मुंबईत उष्णता वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
होसाळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता, असल्याचे IMD ने सांगितले आहे.”
१२वी च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पेपर फुटला नाही, फक्त…, शिक्षणमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण