नवी दिल्ली l New Delhi :
देश सध्या कोरोनाच्या (Corona) महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता आणखी एक बॅक्टेरियाने थैमान घातले आहे. (Terror of Shigella bacteria in Kerala 1 dies after eating food 58 sick)
यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात शिगेला बॅक्टेरियाची (Shigella Bacteria) प्रकरणं समोर आली आहेत. 58 जण आजारी पडले आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शिगेला बॅक्टेरियाचेही रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (At least 58 people fell ill and a young girl died of food poisoning after eating shawarma from a restaurant in the Kasaragod district on Sunday)
and perfringens, salmonella and shigella and you’ll shrink. Most of these organisms are enteric and heat resistant so you gats cooook!. You can even ingest them from vegetables (salads), milk, dairies etc.
Know that under the right temperature+nutrient, bacteria will thrive.— Deaconess Ada🌺✨🦋 (@Uyoyoghene_) May 2, 2022
केरळच्या कासरगोडमध्ये (Kasaragod, Kerala) फूड पॉयझनिंग (Food Poisoning) मागे शिगेला बॅक्टेरिया असल्याचं म्हटलं जात आहे. एका हॉटेलमधील जेवण जेवल्यानंतर तब्बल 58 लोक आजारी पडले. तर एका मुलीचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अन्नपदार्थामुळे विषबाधा होण्याचं कारण शिगेला बॅक्टेरिया असल्याचं सांगितलं आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात (Kozhikode Medical College Hospital) फूड पॉयझनिंग झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
उन्हाळ्यात घामोळ्यांच्या खाजेने हैराण होताय?; ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा
सर्व रुग्णांपैकी पाच रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते, त्यापैकी तीन रिपोर्टमध्ये शिगेला बॅक्टेरियाचं संक्रमण (Bacterial Infection) असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे याला बॅक्टेरियाचा उद्रेक मानलं जात आहे. बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. जिल्हा प्रशासन (District Administration) आणि आरोग्य अधिकारी सामान्य नागरिक आणि अन्नपदार्थ विक्रेत्यांना याबाबत जागरूक करत आहेत. या आजारापासून कसा बचाव करता येईल याचे उपाय सांगितले जात आहेत.
मोठा कट उधळला! महाराष्ट्राकडे स्फोटकांसह निघालेले 4 खलिस्तानी दहशतवादी अटकेत
दूषित अन्नपाण्यामार्फत हे बॅक्टेरिया पसरतात. त्यामुळे अन्नपदार्थ, पाणी स्वच्छ असणं गरजेचं आहे. आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थांची आणि पाण्याचीही तपासणी केली जात आहे. शिगेला बॅक्टेरिया असलेल्या लोकांमध्ये अतिसार, ताप आणि ओटीपोटात दुखणे ही लक्षणं आढळून येतात.
शिगेलाच्या रुग्णांमध्येही 1 ते 2 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. शिगेलाचे सौम्य रुग्ण उपचाराशिवाय बरे होऊ शकतात. परंतु गंभीर प्रकरणे धोकादायक आणि प्राणघातक देखील असू शकतात.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेशला न्यायालयाने सुनावली 'हि' शिक्षा, एकतर्फी...
सभागृहातच सत्ताधारी-विरोधकांची तुफान फटकेबाजी; पाहा कोण काय-काय म्हणतंय ?
बाबो! १०१८ कोटींची रोकड, ड्रग्ज अन् दारु जप्त!... पाच राज्यांमधील अशीही ‘उलाढाल‘
देशातली पहिली BSL-3 लॅब नाशिकमध्ये; २५ कोटी खर्चून निर्मिती, काय काम, महामारीत म...