Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ… 16 ते 18 वर्षाच्या ‘रिल्स स्टार’ची जिंदगी

Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ... 16 ते 18 वर्षाच्या 'रिल्स स्टार'ची जिंदगी l 16 to 18 Teen age TikTok Instagram Reel Star Life
Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ... 16 ते 18 वर्षाच्या 'रिल्स स्टार'ची जिंदगी l 16 to 18 Teen age TikTok Instagram Reel Star Life
Share on Social Sites

व्हॉट्सॲपवर (WhatsApp) दर 1-2 महिन्यांनी पोरांचे स्टेटस बघतो ज्यात ते एका अपघातातमध्ये दगावलेल्या दानिश जेहनचे (Danish Zehen) फोटो स्टेटसला टाकून रडत असतात. (WhatsApp Viral Post) बरं ते फक्त रडतच नाहीत तर त्याला ‘तू प्लिज परत ये’ अशा रिक्वेस्ट करत असतात.

हे असले स्टेट्स (Status) टाकणारे सगळे लेकरं 16-18 वर्षांची आहेत. यांची दुनियाची वेगळी असते. बारक्या भावाचा वाढदिवस असेल तर ‘बृह जान’ (Bruhh Jaan) बहिणीचा असेल तर, सीसो जान, सिस्टा (Siso Jaan, Sista).

आई-बाप, मामा-मामी, काका-काकी, चुलता असेल तर कॅप्शन ला ‘सपोर्ट सिस्टीम’ (Support System 😎) ठरलेलं असत. मोठा भाऊ असेल तर ‘कुठं पण राडा करायचं हमखास लायसन्स’ अशा टाईपचे कॅप्शन असतात.

Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लागेल असे निर्णय घेऊ नका…

लोकडाउनमुळे (Lockdown) शाळा, कॉलेज (School, College) बंद असल्या कारणाने या पिढीकडे करण्यासारखं काहीच नसल्याने हे पोर, पोरी सकाळी उठून अंघोळ करून मस्त फ्रेश होऊन एखाद्या बिल्डिंग जवळ जातात आणि इन्स्टाग्रामवर रिल्स (Instagram Reels) बनवत बसतात.

मोठ्या बिल्डिंगचा शॉट, नंतर या पोराचा छपरी डायलॉग, आणि शेवटी स्लोमोशन मध्ये निघून जायचं. जाताना आदर्श शिंदेच (Adarsh Shinde) एखाद गाणं, एखाद धताड ततड म्युजिक, फ्लॅश, खालीवर हलणारी फ्रेम आणि झालं फडतूस रिल्स.

या पोरांकडे घरी रडून-रडून नाहीतर मग मित्राच्या क्रेडिट कार्डवर (Credit Card) इएमआयवर (EMI) घेतलेला आयफोन (iPhone) असतो. ऍपल फोन (Apple Phone) सारख दिसणार एखाद स्वस्तातील घड्याळ, फर्स्ट कॉपी असलेले कपडे. यांच्यातली बरीच पोर सपाट छातीची असतात.

सपाट छातीला चिटकलेला सपाट पांढरा शर्ट, घोट्या पर्यंत पॅन्ट, कानपूर बाजार मधून घेतलेली 150 रुपयांची मोजरी, 200-300 ला मिळणारे रंगेबेरंगी शूज, गळ्यात सिल्वर कलरच्या चैन आणि हातावर टॅटू अशा एकंदरीत लुक मध्ये हे पोर त्यांच्याच वयाच्या पोरांना प्रेम, पैसा, नाती, जिंदगी यावर ज्ञान देत असतात. आणि निब्बा निब्बी (Nibba Nibbi) वर्गीय पोर-पोरी ते मन लावून ऐकतात.

आत्मसात देखील करतात. यांच्यात कॉमन गोष्ट म्हणजे या सगळ्यांना टोनी कक्कर (Tony Kakkar) आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) आवडते. काही ठिकाणी बादशाह (Badshah) पण चालतो.

यांच्या मध्ये एक शेठ असतो जो या सगळ्यांना कोलतो. कमी लेखतो म्हणून त्याच्या नावाने या कम्युनिटीने लाखो व्हिडीओ बनवले आहेत. ज्यात ते या शेठ ला ‘कसय ना शेठ’, ‘बरका शेठ’, ‘लक्षात ठेवा शेठ’ (O Shet) म्हणत त्याला चॅलेंज करत असतात. या शेठला भारतातली कोणतीच गुप्तचर यंत्रणा आता पर्यंत शोधू शकलेली नाही.

बरं, यांना हलक्यात घेऊन चालत नाही. यांच्यातल्या काही जणांना अक्षरशः 5 ते 10 मिलियन फॉलोवर आहेत. हे एवढे फॉलोवर असणारे पोर काय विशेष करतात अशातला भाग नाही ते पण याच गोष्टी करतात. छपरी डायलॉग, रिमिक्स गाणे (Remix Song), बिल्डिंग, रस्ता, मागे फिरून निघून जाणे एन्ड.

यांच्यातले टॉपची लोक म्हणजे फैजू (Faisal Shaikh), रियाज (Riyaz Aly) यांनी अगदी कशाची लाज न बाळगता स्वतःच्या प्रोफाइलवर तर चक्क अँक्टर लिहून टाकलंय.

Blog (विशेष लेख) : गोष्ट तिच्या मासिक ‘पाळी’ची

नेटफ्लिक्स (Netflix), अँमेझोन प्राईम (Amazon Prime), डिस्नी हॉटस्टारवर (Disney Hotstar) यांचे चित्रपट सर्च केले पण एक सुद्धा भेटला नाही. टिकटॉक (TikTok Reels) प्रमाणे रिल्स बंद झालं तर हे लोक पुढं नेमकं काय करणार आहेत? 5-10 मिलियन वाल्याचं ठीक आहे.

पण मराठी मधल्या गावठी मोटिवेशन स्पीकर (Gavati Motivational Speaker) तथा डिजिटल कंटेंट क्रियेटर (Digital Content Creator) तथा अँक्टर लोकांनी काय करायचं याच टेन्शन येत. छपरी डायलॉग हाणून लाईक्स (Likes), कमेंट्स (Comments) मिळवणाऱ्या पोरींनी कुठं जायचं.

अवघड आहे सारं…

90’किड असले छपरी धंदे करत नाही याचा आनंद वाटतो. पण 90’किड मधल्या काही पोरी ‘बेस्ट हबी इन द वर्ल्ड’ (Best Hubby in the World) मध्ये अडकल्या आहेत याची खंत देखील वाटते.

सदर लेख सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो कोणी लिहिला आहे याबाबत अद्याप खुलासा होऊ शकला नाही.

See also  Bihar Political Crisis : भाजपाला 'जोर का झटका'; बिहारमधील सरकार कोसळलं, मुख्यमंत्री नितीश कुमारांचा राजीनामा

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Horoscope Today : जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य, सोमवार, 01 ऑगस्ट 2022

Share on Social Sites