नवी दिल्ली l New Delhi :
केंद्र सरकारने (Central Government) देश विरोधी आशय पसरवल्याप्रकरणी तब्बल 22 युट्युब चॅनेल्सवर बंदी आणली आहे. यात 4 पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सचाही (4 Pakistan YouTube Channel) समावेश आहे. या युट्युब चॅनेल्सची कोट्यवधींच्या संख्येत व्ह्युज होते. तसेच केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव 3 ट्विटर अकाऊंट (3 Twitter Account), 1 फेसबुक अकाऊंट (1 Facebook Account) आणि 1 न्युज वेबसाईट (1 News Website) ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहे.
या युट्युब चॅनेल्स आणि सोशल मीडिया अकांऊट्सवर भारताची सुरक्षा (India’s security), परराष्ट्र धोरण (Foreign Policy) आणि कायदा सुव्यस्थेबद्दल (Law and Order) खोट्या माहिती प्रसारित होत्या. (Indian government ban 22 YouTube channels and Social Media accounts)
Central govt blocked 22 youtube channels, 18 were operating from India while 4 were from Pakistan. We've blocked such channels earlier too, the total number of blocked channels stands at 78: Union I&B min Anurag Thakur pic.twitter.com/77kYrQL3o2
— ANI (@ANI) April 5, 2022
भारतीय युट्युब चॅनेल्सवर कारवाई (Action on Indian YouTube channels)
माहिती तंत्रज्ञान कायदा 2021 (Information Technology Act 2021) नुसार पहिल्यांदाच भारतीय युट्युब चॅनेल्सवर कारवाई (YouTube Channel Strike) करण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१ ची सूचना जारी केले होती. नव्या निर्णयानुसार १८ भारतीय आणि ४ पाकिस्तीन युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. या युट्युब चॅनेल्सवर फेक न्युज (Fake News) पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या युट्युब चॅनेलवर जम्मू कश्मीर (Jammu Kashmir) मुद्द्यावर खोट्या बातम्या प्रसारित होत होत्या. त्यांच्या सोशल मीडियावर अकांटवर भारत विरोधी कंटेट पोस्ट करण्यात येत होता. अनेक भारतीय युट्युब चॅनेलवर युक्रेन रशिया युद्धावर (Ukraine-Russia war) खोट्या आणि चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या होत्या.
या भारतीय चॅनेल्सवर बंदी
ARP News, AOP News, LDC News, Sarkari Babu, SS ZONE Hindi, Smart News, News23 Hindi, Online Khabar, DP news, PKB News, Kisan Tak, Borana News, Sarkari News Update, Bharat Mausam, RJ ZONE 6, Exam Report, Digi Gurukul
हे पाकिस्तानी युट्युब चॅनेल्स बॅन (Banned Pakistani YouTube Channels)
Duniya Mery Aagy, Ghulam Nabi Madni, HAQEEQAT TV, HAQEEQAT TV 2.0
वेबसाइट्स (Banned Website)
Dunya Mere Aagy
या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी (Banned Social Media Account)
ट्विटर (Twitter) : Ghulam Nabi Madni, Dunya Mery Aagy, Haqeeqat TV
फेसबुक (Facebook) : Dunya Mery AagyLive TV
These channels were involved in spreading misinformation impacting India's sovereignty, national security & relations with other countries. They were spreading fake news about the pandemic & Russia-Ukraine crisis. We won't shy away from taking such action in future: Anurag Thakur pic.twitter.com/y8mKzNP7gQ
— ANI (@ANI) April 5, 2022
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
INS Vikrant : जय भवानी, जय शिवाजी! नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोह...
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...
Union Budget 2022-23 : वेतनधारकांसाठी सरकारची करमुक्तीची भेट, पाच लाखांपर्यंतचा ...
20 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसाठी 4 लेकरांच्या आईनं केली हद्द पार; नाशकात लव्हस्टोर...