
धुळे l Dhule :
मुंबई -आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) कंटेनर आणि केमिकल वाहतूक करणाऱ्या टॅकरमध्ये भीषण अपघात (Containers and chemical tanker Accident) झाला आहे.
हाडाखेड-पलासनेर (Hadakhed-Palasner) गावाच्या परिसारामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. अपघातातनंतर टँकरला आग लागली, या आगीमध्ये ड्रायव्हर आणि क्लीनरचा जळून मृत्यू झाला आहे. (Driver and Cleaner killed on the spot) कंटेनरमध्ये काही ट्रॅक्टर होते.
ट्रॅक्टरच्या टायरने अचानक पेट घेतल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आग पसरल्याने टॅंकरने देखील पेट घेतला, या आगीमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अपघातग्रस्त वाहने जळून खाक झाली आहेत.
रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरमधून उग्र वास येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकत्याच मिळालेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.
दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Both died on the spot)
घटनेबाबत सविस्तर अधिक माहिती अशी की, इंदोर (Indor) कडून मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकर आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. पळासनेर (Palasner) परिसरामध्ये हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टँकरचा चुराडा झाला असून, अपघातानंतर आग देखील लागली होती. या आगीमध्ये जळून टँकरच्या चालकाचा आणि क्लिनरचा मृत्यू झाला आहे. मृतांची नावे अद्याप समोर येऊ शकलेली नाही आहे. तर कंटेनरचा चालक या अपघात थोडक्यात बचावला आहे.
ऐका हो ऐका! ठाकरे सरकारची नवी नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद : वाचा एका क्लिकवर