
मुंबई l Mumbai :
राज्यात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर (Corona Second Wave) नियंत्रण मिळविल्यानंतर आता तिसरी लाटही (Corona Second Wave) ओसरली असून, संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या (Corona Task Force) तज्ज्ञांनी दिली.
याचपार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच, ०१ फेब्रुवारी २०२२ पासून सर्व पर्यटनस्थळे (Ttourist Destinations), राष्ट्रीय उद्याने (National Parks), सफारी (Safari) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व पर्यटनस्थळे (Tourist Destinations), राष्ट्रीय उद्याने (National Parks), सफारी (Safari) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे (Weddings) व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी (Cultural Events) आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी २० व्यक्तींची मर्यदा हटवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारच्या नव्या नियमावलीत नेमकं काय म्हटलंय? (What exactly is said in the new rules of the state government?)
-
सर्व पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट (Online Ticket) खरेदी करावी लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचे लसीकरण झालेले असावे.
-
स्पा (Spa), ब्युटी पार्लर (Beauty Parlor) आणि सलूनमध्ये ५० टक्के उपस्थिती असावी.
-
अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत. किती लोक उपस्थित राहू शकतात.
-
उपहारगृह (Restaurants), नाट्यगृह (Theaters), चित्रपटगृह (Cinema Halls) स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने.
-
नॅशनल पार्क (National Park) आणि जंगल सफारी (Jungle Safari) आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. तसेच मास्कही वापरण्यात यावा.
-
अम्युझमेंट पार्क (Amusement parks), थिमपार्क (Theme Parks), जलतरण तलाव (Swimming Pools), वॉटर पार्क (Water Parks) ५० टक्के क्षमतेने सुरु होतील.
-
हॉटेल (Hotels), रेस्टॉरंट (Restaurants) आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1488213680210968576?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1488213680210968576%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmumbai%2Ftourist-places-in-the-state-will-reopen-from-today-thackeray-government-announces-new-rules-a642%2F
दरम्यान, राज्यात काल सोमवारी १५,१४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे तर दुसरीकडे ३५,४५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ७३,६७,२५९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात २,०७,३५० रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने (Public Health Department) दिली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४२ टक्के, तर मृत्युदर १.८५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ७,४६,२९,४४९ नमुन्यांपैकी १०.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ११,७४,८२५ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये (Home Quarantine) आहेत, तर २,७९८ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,२१,१०९ झाली असून, मृतांचा आकडा एक लाख ४२ हजार ६११ इतका आहे.
Nashik Municipal Election 2022 : निवडणुकीचा धुराळा उडणार; नाशिक महापालिकेची ‘अशी’ असेल प्रभाग रचना