मुंबई l Mumbai :
विधान परिषदेच्या (Legislative Council Election) दहा जागांसाठी येत्या दि. 20 जून रोजी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने आता या निवडणुकीतही महाविकास आघाडी (मविआ) (Maha Vikas Aghadi) आणि भाजपमध्ये (Bhartiya Janata Party BJP) चुरशीची लढत होऊ घातली आहे.
Video : तरुणांना सैन्य भरतीची सुर्वणसंधी; सरकार कडून ‘अग्निपथ’ची घोषणा, पहा काय नेमकी योजना?
या निवडणुकीसाठी भाजपने सहा, राष्ट्रवादीने (Nationalist Congress Party (NCP) तीन आणि शिवसेना (Shiv Sena), काँग्रेसने (Congress) प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 13 उमेदवारांपैकी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिरिक्त उमेदवार शिवाजी गर्जे (NCP’s additional candidate Shivaji Garje) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
मोदी हैं तो…! देशात 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार केंद्र सरकार
मात्र भाजप पाच जागा लढण्यावर ठाम राहिला तर काँग्रेसनेही एक उमेदवार मागे घेण्यास नकार दिला. भाजप आणि काँग्रेसने आपला अतिरिक्त उमेदवार कायम ठेवल्याने निवडणूक अटळ झाली. या निवडणुकीतही भाजपने पाचवी जागा निवडून आणण्याचा दावा केल्याने काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप (Congress Bhai Jagtap) किंवा चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) हे डेंजर झोनमध्ये असल्याचे मानले जात आहे.
आमदार फुटण्याची भीती
संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य निवडून जाऊ शकतो. आता राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीतही आमदारांची रस्सीखेच सुरू होणार असून महाविकास आघाडीपुढे पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी तब्बल 22 मते लागतील. राज्यसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की ओढवल्याने विधान परिषदेची निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, असा सूर महाविकास आघाडीत होता. राज्यसभा निवडणुकीत खुली मतदान पद्धती असतानाही आघाडीची मते फुटली. आता विधान परिषदेसाठी तर गुप्त मतदान असल्याने आणखी एक फटका बसण्याची भीती शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांना आहे. मात्र माघार कुणी घ्यायची यावर एकमत झाले नसल्याने आघाडीचे सहा उमेदवार रिंगणात राहिले. परिणामी राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची निवडणूकही चुरशीची होईल.
भाजपचे उमेदवार (BJP Candidates) : प्रा. राम शिंदे (Prof. Ram Shinde), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), प्रसाद लाड (Prasad Lad), श्रीकांत भारतीय (Shrikant Bharatiya), उमा खापरे (Uma Khapre).
भाजपचे गणित : पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान 135 मतांची गरज आहे. भाजपकडे स्वतःची 106 आणि पाठिंबा देणारे छोटे पक्ष व अपक्ष मिळून 113 आमदारांचे संख्याबळ आहे. म्हणजे भाजपला किमान अतिरिक्त 22 मतांची गरज आहे.
#BIGNEWS Legislative Council Election
सदाभाऊंची अर्ज माघारी
भाजपाचे ५ तर मविआचे ६ उमेदवार मैदान
विधान परिषद उमेदवारी अटळ#JaimaharashtraNews #MarathiNews #Maharashtra @Sadabhau_khot @MahavikasAghad3 #Vidhanparisgad @BJP4India— Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) June 13, 2022
राष्ट्रवादीचे उमेदवार (NCP Candidates) : रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar), एकनाथ खडसे (Eknath Khadse)
राष्ट्रवादीचे गणित : राष्ट्रवादीकडे 53 मते असली तरी त्यांचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे तुरुंगात आहेत. कोर्टाने परवानगी दिली तरच ते मतदान करतील. पण सध्या 51 मते राष्ट्रवादीकडे आहेत. दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी तीन मतांची त्यांना गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनही काँग्रेसच्या दुसर्या उमेदवाराला एकही मत मिळणार नाही.
पैगंबर मोहम्मद प्रकरण भोवलं; भाजपच्या नुपूर शर्मांसह ‘या’ 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिवसेनेचे उमेदवार (Shivsena Candidates) : सचिन अहिर (Sachin Ahir), आमशा पाडवी (Amsha Padvi)
शिवसेनेचे गणित : शिवसेनेकडे 55 मते असून त्यांच्या दोन उमेदवारांनाच हा कोटा दिला जाईल.
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर आता करू शकतो पण…;उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
काँग्रेसचे उमेदवार (Congress Candidates) : चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore), भाई जगताप (Bhai Jagtap)
काँग्रेसचे गणित : काँग्रेसला दोन जागा जिंकण्यासाठी 54 मतांची गरज आहे. काँग्रेसकडे (Congress) स्वतःचे 44 आमदार आहेत. काँग्रेसला अतिरिक्त 10 मतांची गरज आहे. भाई जगताप किंवा हंडोरे यापैकी एकास आणखी दहा मतांची गरज आहे. काँग्रेसचा हा दुसरा उमेदवार डेंजर झोनमध्ये आहे. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे शिल्लक मते नाहीत.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; महाराष्ट्रातील पाचजण जागीच ठार, 2 गंभीर
दुर्दैवी! शाळेत ध्वजारोहणावेळी विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर राष्ट्रवादीची भाजपसोबत युती?, शरद पवारांनी ...
अंजनीच्या सुता तुझा जन्म कुठला? हनुमान जन्मस्थळाचा वाद पेटला; साधू महंतांमध्ये '...