
नाशिक । Nashik :
शहरातील नाशिक रोड परिसरातील जयभवानी रोडवर (Jayabhavani Road, Nashik Road) आज (दि. ३१) बिबट्याने नागरी वसाहतीत घुसून तब्बल ७ तास लपंडाव केला. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.
अखेर वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करत या बिबट्याला पकडले. हा बिबट्या सकाळी ०७ वाजता जय भवानी रोडवर पाहायला मिळाला होता. त्यानंतर त्याचा नागरी वसाहतीत वावर होता. अखेर गायकवाड (Gaikwad) निवास येथे एका कारखाली असताना वनविभागाने त्याला बेशुद्ध करत पकडले.
आदिवासी पाड्यावरील जीवघेणी हेळसांड थांबता थांबेना; रुग्णाला खांद्यावर घेऊन अडीच किलोमीटर पायपीट