
मुंबई l Mumbai :
मुंबईतील आलिशान क्रूझवर सुरू पार्टीवर एनसीबीने (Narcotics Control Bureau NCB) केलेल्या कारवाईमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Actor Shah Rukh Khan’s son Aryan Khan) यालाही अटक करण्यात आली होती. या कारवाईवरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर एनसीबीकडून तपासासाठी एसआयटीची (SIT) स्थापना करण्यात आली होती.
दरम्यान, या तपासात आर्यन खानविरोधात (Aryan Khan) कुठलाही सबळ पुरावा सापडला नाही. तसेच ड्रग्सच्या मोठा कटाचा किंवा सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा एसआयटीला आढळला नाही, असा दावा आज एनसीबीच्या एसआयटीच्या हवाल्याने करण्यात आला होता. मात्र या संबंधी प्रसारित होत असलेल्या वृत्तांवर एनसीबीने स्पष्टीकरण दिले आहे.
Video : खळबळजनक! ‘रशियन सैनिक भारतीय मुलींना घेऊन गेलेत’, विद्यार्थिनीची आपबीती