Budget 2022 Highlights : बजेटचा तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?; तुम्हाला नेमकं काय मिळालं? : वाचा सविस्तर…

सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार? सर्वसामन्यांचा खर्च वाढणार की दिलासा मिळणार, यावर एक नजर टाकुयात l Budget Highlights 2022-23
सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार? सर्वसामन्यांचा खर्च वाढणार की दिलासा मिळणार, यावर एक नजर टाकुयात l Budget Highlights 2022-23
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. तब्बल दीड तास सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे (Budget) वाचन केले आहे. सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला (Women), शेतकरी (Farmer) तसेच विद्यार्थ्यांचा (Students) उल्लेख केला आहे.

महत्वाचे म्हणजे आरबीआयचे डिजिटल चलन (RBI Digital Currency) येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. त्यासह संरक्षण क्षेत्र (Defense Sector) संशोधनासाठी खुल करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1488445844361650180

पण सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षात करोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांना (Taxpayer) दिलासा मिळेल असे वाटले होते. पण कररचनेत (Tax Structure) कोणतेही बदल न झाल्याने पुन्हा एकदा पदरी निराश पडली आहे. गेल्या सहा वर्षांपासून कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

https://twitter.com/myogiadityanath/status/1488460523427741696

निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा (Modi Government) १० वा अर्थसंकल्प होता. यावेळीदेखीलअर्थमंत्र्यांनी पेपरविना अर्थसंकल्प (Paperless Budget) मांडण्यात आला. गेल्यावर्षी देखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता.

https://twitter.com/airnewsalerts/status/1488448972884643840

जाणून घेवूयात, काय स्वस्त होणार? (What will be Cheaper?)

चामड्याच्या वस्तू (Leather goods), कपडे (Cloth), कृषी साहित्य (Agricultural Materials), पॅकेजिंग बॉक्स (Packaging Boxes), मोबाईल फोन चार्जर (Mobile Phone Chargers), रत्ने (Gems) आणि दागिने (Jewelry) स्वस्त होतील. रत्ने आणि दागिन्यांवरचे कस्टम ड्युटी (Customs Duty) ५ टक्के करण्यात आली आहे. कट (Cut) आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील (Polished Diamonds) कस्टम ड्युटीही ५ टक्के करण्यात आली आहे. MSME ना आधार देण्यासाठी स्टील स्क्रॅपवरील (Steel Scrap) कस्टम ड्युटी सूट एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. तेलावरील कस्टम ड्युटी कमी. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाईल फोन चार्जर (Mobile Phone Chargers), ट्रान्सफॉर्मर (Transformers) इत्यादींवर कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्यात आली आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1488136090544484352

See also  Google Dog : शाब्बास! नाशिक पोलिस श्वान पथकातील ‘गुगल’ने शाेधली अपहृत अकरा वर्षांची मुलगी

जाणून घेवूयात, काय महाग होणार? (Let’s find out, what will be the cost?)

आयात शुल्कातून सूट काढून भांडवली वस्तूंवर ७.५ टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. इमिटेशन ज्वेलरीवरील (Imitation Jewelery) कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे जेणेकरून त्याची आयात कमी करता येईल. परदेशी छत्रीही (Foreign Umbrella) महागणार आहे.

https://twitter.com/yadavakhilesh/status/1488455459866804224

या आहेत अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा (Big announcements in the Budget)

  • ६० लाख नोकऱ्या दिल्या जातील.

  • पुढील ०३ वर्षांत ४०० नवीन वंदे भारत रेल्वे (Vande Bharat Railways) चालवल्या जातील.

  • ०३ वर्षात १०० पीएम गति शक्ती कार्गो टर्मिनल (PM Gati Shakti cargo terminal) विकसित केले जातील.

  • १.५ लाख पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग (Post offices Core Banking) अंतर्गत येतील. पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन ट्रान्सफर (Online Transfer) शक्य होणार आहे.

  • २०२२-२३ मध्ये ८० लाख नवीन घरे बांधली जातील.

  • देशात डिजिटल विद्यापीठ (Digital University) तयार केले जाईल.

  • २०,००० कोटी रुपये खर्चून २५ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग (National Highway) बांधले जातील.

  • देशातील ५ मोठ्या नद्यांना जोडण्यासाठी जलसंपदा विकास मंत्रालयाच्या (Ministry of Water Resources Development) मदतीनेही काम केले जाईल.

  • ७५ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग (Digital Banking) सुरू करण्यात येणार आहे.

  • २०२२-२३ मध्ये इ-पासपोर्ट (e-Passport) लागू केला जाईल.

  • शहरांच्या विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची (Center of Excellence) स्थापना केली जाईल.

  • एक राष्ट्र, एक नोंदणी योजना (One Nation, One Registration) सुरू केली जाईल. त्यामुळे व्यवसाय करणे सोपे जाईल.

  • इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमला (Electric Vehicle Ecosystem) प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल.

ऐका हो ऐका! ठाकरे सरकारची नवी नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद : वाचा एका क्लिकवर

See also  SMBT कॉलेज बसला भीषण अपघात; २२ हुन अधिक विद्यार्थी जखमी

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Nashik : देवळाली जवळ पवन एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; एकाचा मृत्यू : अनेक जखमी

Share on Social Sites