पोलीस चौकीतील ओली पार्टी भोवली; ‘ते’ चार मद्यपी पोलीस थेट निलंबित

पोलीस चौकीतील ओली पार्टी भोवली; 'ते' चार मद्यपी पोलिस थेट निलंबित l Four Police suspended in illegal alcohol party at police chowki Gangapur Road Nashik
पोलीस चौकीतील ओली पार्टी भोवली; 'ते' चार मद्यपी पोलिस थेट निलंबित l Four Police suspended in illegal alcohol party at police chowki Gangapur Road Nashik
Share on Social Sites

नाशिक | Nashik :

शहरातील गंगापूर पोलिस ठाण्यांंतर्गत दादोजी कोंडदेव नगर चौकीत (Gangapur Road Police) ओली पार्टी रंगल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस चौकीतच मद्यधुंद पोलीस पार्टी करत असताना नागरिकांनी रंगेहाथ या पोलिसांनाच पकडले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय ( Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांच्या निर्णयाकडे नाशिककरांचे लक्ष लागून होते. दरम्यान, आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ चार पोलिसांना निलंबित केले आहे. मद्य पार्टी करणाऱ्या रघुनाथ ठाकूर (Raghunath Thakur), सुरेश जाधव (Suresh Jadhav), मयूर सिंग (Mayur Singh), सागर बोधले (Sagar Bodhle) या चार पाेलिसांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी दिले आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशीही हाेणार आहे.

याबाबतची माहिती देत असताना आयुक्त म्हणाले की, शहरातील पोलीस ठाण्यांच्या धर्तीवर पोलीसा चौक्याही अद्यायावत करणार आहोत. चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) असतील असे देखील ते म्हणाले आहे.

वा रे वा नाशिक पोलिस! थेट पोलिस चौकीतच रंगली ‘ओली पार्टी’; Video काढणाऱ्यांना चोप

गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगर (Dadoji Kondadev Nagar, Gangapur Road) परिसरात प्रेमी युगुलांचे चाळे नियमित सुरु असतात. याबाबतची तक्रार देण्यासाठी काही नागरिक पोलीस चौकीवर गेले होते. या नागरिकांनी पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पहिले. टेबलवर दारूचे भरलेले ग्लास दिसले. हा सर्व प्रकार एका नागरिकाने व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या नागरिकांसोबत वाद घालत धक्काबुक्की आणि मारहाण केली.

इगतपुरीतील हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत नको त्या अवस्थेत आढळले 52 तरुण

घडलेल्या प्रकारची माहिती परिसरात समजल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात स्थानिकांचा मोठा जमाव जमला होता. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले होते. यानंतर रात्री उशिरा नागरिक पोलीस ठाण्यातून माघारी फिरले होते.

आज (दि. १६) सकाळी या प्रकारची गंभीर दखल आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतली असून तात्काळ दोषी आढळलेल्या चारही पोलिसांना निलंबित केले आहे.

8 बँकांवर RBI ची मोठी कारवाई! तुमचं ‘या’ ठिकाणी खातं आहे का?

See also  'मनसे'ची माघार.. अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं 'हे' कारण

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  World Menstrual Hygiene Day 2022 : मासिक पाळीदरम्यान ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, 28 मे राेजीच का साजरा केला जातो 'हा' दिन?; वाचा सविस्तर...

Share on Social Sites