
नाशिक | Nashik :
नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी गंगाधरन डी (Gangadharan D) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Suraj Mandhare got transferred. Gangadharan D is new Collector of Nashik District) मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयातील उपसचिव गंगाथरण डी. यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या (Swarajya Sanstha elections) पार्श्वभूमीवर विद्यमान जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली झाली असून पुणे येथील शिक्षण आयुक्तपदी (Commissioner of Education at Pune) त्यांची नियुक्ती झाली आहे.
आज (दि. ०९) प्राप्त झालेल्या आदेशानुसार डॉ. संजय चहांदे (Dr Sanjay Chahande), ए एम लिमये (A M Limaye) , एसए तागडे (S A Tagde), आभा शुक्ला (Abha Shukla), डॉ. अमित सैनी (Dr. Amit Saini), आर एस जगताप (RS Jagtap), विवेक भीमानवार (Vivek Bhimanwar), राहुल द्विवेदी (Rahul Dwivedi) आणि गंगाधरन देवराजन (Gangadharan Devarajan) या नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Transferred) बदल्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये गंगाधरन देवराजन यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Gangadharan Devrajan is new Collector of Nashik District) ऑक्टोबर २०२१ मध्ये गंगाधरन वसई विरार महापालिकेचे आयुक्त (Commissioner of Vasai Virar Municipal Corporation) असताना त्यांची नाशिकला बदली झाल्याची जोरदार चर्चा मुंबईसह परिसरात होती. गंगाथरण २०१३ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी नाशिकमधूनच प्रशासकीय सेवेचा श्रीगणेशा केला होता.
आदिवासी एकात्मिक विभाग कळवण आणि कळवणचे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांची धुळे जिल्हा परिषद (Dhule Zilla Parishad) येथे बदली झाली. त्यानंतर तेथेच जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर वसई-विरार येथे मनपा आयुक्त म्हणून त्यांनी काम केले. तेथे मनपाची मुदत संपली. कोरोना संकट वाढल्याने प्रशासक म्हणूनही त्यांचीच नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांची मुख्य सचिव कार्यलयात उपसचिव पदी बदली करण्यात आली होती. गंगाधरन देवराजन हे २०१३ सालचे आयएएस अधिकारी (IAS officer) आहेत.
धक्कादायक! उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा सशस्त्र दरोडा; जाता-जाता घरातील महिलांसमोर डान्स