नवी दिल्ली l New Delhi :
एअरटेलच्या (Airtel) ग्राहकांना आज (दि. ११) सकाळपासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एअरटेलच्या ब्रॉडबँडपासून (Airtel broadband) ते मोबाईल नेटपर्यंत अनेक सेवा डाऊन झाल्या आहे.
सोशल मीडियावर एअरटेल युझर्सकडून (Airtel Down) देण्यात येत असलेल्या माहितीनुसार त्यांना मोबाईल इंटरनेट (Airtel Internet Down) आणि कॉलिंगमध्ये (Airtel Calling Down) अडचणी येत आहेत.
Our internet services had a brief disruption and we deeply regret the inconvenience this may have caused you. Everything is back as normal now, as our teams keep working to deliver a seamless experience to our customers.
— airtel India (@airtelindia) February 11, 2022
देशभरातील अनेक ग्राहकांकडून याबाबत दावे करण्यात येत आहेत. याबाबत एअरटेल युझर्स ट्विटर (Airtel Users) तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तक्रारी करत आहेत. तसेच तक्रारींचा ओघ वाढल्याने सोशल मीडियावर अल्पावधीत #AirtelDown हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एअरटेलच्या इंटरनेटमध्ये आज (शुक्रवार) सकाळी ११.३० वाजल्यापासून समस्या येत आहे. अनेक लोकांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
https://twitter.com/mohit_munjal/status/1492048073870114818
डाऊनडिटेक्टरने (DownDetector) सांगितले की, आऊटेजचा फटका भारताच्या अनेक प्रमुख शहरांना बसला. ज्यामध्ये दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), बंगळुरू (Bangalore), हैदराबाद (Hyderabad), अहमदाबाद (Ahmedabad), जयपूर (Jaipur), कोलकाता (Kolkata) आणि इतर अनेक शहरांचा समावेश आहे.
Video : प्रतीक्षा संपली! OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन ‘या’ तारखेला होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
खळबळजनक! व्हिडीओ शूट करत ३ जवानांचा महिलेवर सामूहिक बलात्कार
अखेर 'या' दिवसापासून नाशिककर होणार निर्बंधमुक्त; पालकमंत्री भुजबळ यांची माहिती
Aftab Ahmed Khan : मुंबई ATSची स्थापना करणारे पूर्व IPS अधिकारी ए. ए. खान कालवश
अँड्रॉइड युजर्सना झटका! Google Play Store पॉलिसी उद्यापासून बदलणार; Call Recordi...