नवी दिल्ली l New Delhi :
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट-२०२२’ परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. (The maximum age limit has been removed for the ‘NEET 2022’ examination for admission to medical courses) सामान्य प्रवर्गासाठी ही वयोमर्यादा २५ वर्षे, तर राखीव प्रवर्गासाठी ती ३० वर्षे होती. किमान वयाची मर्यादा १७ वर्षे होती. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) हा निर्णय घेतला आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयोगाचे सचिव डॉ. पुलकेश कुमार यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (National Testing Agency) कळवली आहे. गेल्या वर्षी १५.५० लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. या मुद्द्यावर काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
NEET UG 2022 के लिए योग्यता में संशोधन, NMC ने हटाई अधिकतम आयु सीमा https://t.co/KZKpwexfcb via @Lenden news
— Lenden News (@lendennews) March 10, 2022
प्रॅक्टिकल परीक्षा तीन तासांची (Practical exam of three hours)
सीबीएसईने टर्म-२ (CBSE Term 2) च्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्यानंतर सहा दिवसांनंतर तीन विषयांच्या परीक्षेचे शेड्यूल बदलले. आता फिजिक्स (Physics), केमिस्ट्री (Chemistry) आणि बायोलॉजीची (Biology) प्रात्यक्षिक परीक्षा तीन तासांची होईल. ती पूर्वी दीड तासाची होती, तर भूगोल (Geography) आणि होम सायन्स (Home Science) सारख्या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा दीड तासाचीच असेल. अनेक शाळांत या काळात या विषयांचे प्रात्यक्षिक दीड तासाचेच झाले आहे.
‘आप’ची ‘मान’ उंचावणारा Punjab King; कॉमेडियन टू CM कसा आहे ‘भगवंत’ यांचा प्रवास
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Facebook वरून 'न्युड व्हिडिओ कॉल' करत 'सेक्स्टॉर्शन'; खंडणी उकळण्याचा प्रयत्न
Nashik Municipal Election 2022 : निवडणुकीचा धुराळा उडणार; नाशिक महापालिकेची 'अशी...
धक्कादायक! गुजरातच्या 'या' फेक कंपनीने खान्देशातील 4 हजार लोकांना लावला 76 कोटीं...
दाभोळकरांच्या खुन्यांची ओळख पटली.. साक्षीदाराकडून महत्त्वाची साक्ष