नाशिक l Nashik :
अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसून तिच्यावर बलात्कार करत चुलत बहिणीसोबतही असेच करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करत तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सचिन मुरलीधर सोनवणे (Sachin Muralidhar Sonawane) (३२, रा. वाघाडी, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे महिलादिनी (Women’s Day) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख (Additional District and Sessions Judge D. D. Deshmukh) विशेष पोक्सो (POCSO Act) न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. चार वर्षांने पीडित मुलीला न्याय मिळाला.
खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१८ मध्ये टाकळीरोड (Takali) भद्रकाली परिसरात (Bradakali) राहणारी १३ वर्षीय मुलगी दिवाळीच्या सुट्टीत घरी आली होती. नात्याने चुलत मामा असलेला आरोपी सचिन सोनवणने घरी एकटी असताना तिला किचन रुममध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकाराबाबत कुणास काही सांगीतले तर तुझ्या काकाच्या मुलीसोबत असेच करले, अशी धमकी देत वारंवार अत्याचार केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. तिने मुलीला जन्म दिला. भद्रकाली पोलिस ठाण्यात (Bhadrakali police station) आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धक्कादायक! उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा सशस्त्र दरोडा; जाता-जाता घरातील महिलांसमोर डान्स
तत्कालीन उपनिरीक्षक जयश्री अनवणे (Sub-Inspector Jayashree Anwane) यांनी आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र विशेष पोक्सो न्यायालयाने फिर्यादी, पंच साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठवली. सरकार पक्षातर्फे अँड. दीपशिखा भिडे यांनी कामकाज पाहिले. पैरवी व्ही. एम. सोनवणे, एस. सी. शिंदे यांनी पाठपुरावा केला.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
पोटच्या 16 महिन्यांच्या मुलीला दारु पाजून, अनैसर्गिक अत्याचार करुन केला खून; आई-...
Today’s Horoscope : 'या' राशिंसाठी आजचा दिवस असेल खास; जाणून घ्या पंचांग अन् राश...
बहुप्रतीक्षित! OnePlus Nord 3 लवकरच भारतात होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर...
WWE शोकसागरात! ‘या’ दिग्गज रेसलरचे निधन; ३ वेळा आला होता 'हार्ट अटॅक'