इगतपुरीतील हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत नको त्या अवस्थेत आढळले 52 तरुण

इगतपुरीतील हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत नको त्या अवस्थेत आढळले 52 तरुण l Prostitution Hookah party at Mountain Shadow Resort 52 youth and 2 woman arrested Igatpuri Nashik
इगतपुरीतील हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत नको त्या अवस्थेत आढळले 52 तरुण l Prostitution Hookah party at Mountain Shadow Resort 52 youth and 2 woman arrested Igatpuri Nashik
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) येथील एका प्रसिद्ध रिसॉर्टमधील हुक्का पार्टीत (Igatpuri Resort Hookah Party) सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश (Prostitution exposed in Igatpuri resort) केला आहे.

संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत दोन महिलांसह तब्बल 52 तरुणांना ताब्यात घेतले आहे. संबंधित 52 जणांना इगतपूरी न्यायालयाने (Igatpuri court) दणका दिला असून सर्वांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर वेश्याव्यवसायासाठी महिला पुरवणाऱ्या दोन आरोपी महिलांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास इगतपुरी पोलीस (Igatpuri Police) करत आहेत.

Facebook वरून ‘न्युड व्हिडिओ कॉल’ करत ‘सेक्स्टॉर्शन’; खंडणी उकळण्याचा प्रयत्न

शिल्पा सिराज कुरेशी (Shilpa Siraj Qureshi) व दीपाली देवळेकर (Deepali Devalekar) असे गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपी महिलांची नावे असून त्या हुक्का पार्टीत वेश्याव्यवसायासाठी महिला पुरवण्याचे काम करत होत्या. अन्य अटक केलेले 52 तरुण हे रेवती कंपनीच्या हार्डवेअर स्पेअरपार्ट कंपनीचे (Revati Hardware Spare Parts Company) प्रत्येक राज्यातील होलसेल डिस्ट्रीब्यूटर (Wholesale Distributors) आहे.

वा रे वा नाशिक पोलिस! थेट पोलिस चौकीतच रंगली ‘ओली पार्टी’; Video काढणाऱ्यांना चोप

संबंधित सर्वजण दि. 13 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध माऊंटन शॅडो रिसॉर्ट (Mountain Shadow Resort Igatpuri) याठिकाणी हुक्का पार्टी करत होते. या अवैध पार्टीची माहिती इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांना मिळाली होती.

गुप्त माहितीच्या आधारे इगतपुरी पोलिसांनी संबंधित ठिकाणावर छापेमारी केली. यावेळी येथे पोलिसांनी 52 तरुण नशेत धुंद झालेल्या अवस्थेत आढळले होते. पोलिसांनी कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले आहे.

सहकार सुर्य मावळला; माजी मंत्री शंकरराव कोल्हे कालवश

या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर देहविक्रीसाठी महिला पुरवणाऱ्या दोन महिलांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित दोन्ही महिला राज्यभरातील वेश्याव्यवसायाच्या साखळीत गुंतल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. इगतपुरी पोलीस आरोपी महिलांची कसून चौकशी करत आहे.

या छापेमारीत पोलिसांनी वेश्या व्यवसायात गुंतलेल्या 18 तरुणींची सुटका केली असून महिला सुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. संबंधित तरुणींच्या पालकांना याची माहिती दिल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

काळजी घ्या..! दोन दिवस उष्णतेचे; ‘या’ शहरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार

See also  Viral Video : दे दणा दण! Propose Day ला वाद; नाशिकच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन ग्रुपमध्ये 'फ्री स्टाईल'

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  INS Vikrant : जय भवानी, जय शिवाजी! नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोहोर! काय आहे कनेक्शन?

Share on Social Sites