बाप रे बाप! ‘हे’ काम करून देतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या निकटर्तीयाकडून नाशकात तब्बल 6 कोटींची फसवणूक

बाप रे बाप! 'हे' काम करून देतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या निकटर्तीयाकडून नाशकात तब्बल 6 कोटींची फसवणूक l Shocking! Six crore eighteen lakh rupees fraud in Nashik Nasik
बाप रे बाप! 'हे' काम करून देतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या निकटर्तीयाकडून नाशकात तब्बल 6 कोटींची फसवणूक l Shocking! Six crore eighteen lakh rupees fraud in Nashik Nasik
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत (Rajasthan Chief Minister Ashok Gelhot) यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगून एकाने विविध सरकारी योजनांच्या कामांमध्ये गुंतवणूक करण्यास नाशिकच्या तरूणाला भाग पाडले. यामाध्यमातून तरूणाची तब्बल सहा कोटी 80 लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला असून याप्रकरणी परराज्यातील पंधरा जणांविरोधात गंगापूर पोलिस स्थानकात (Gangapur police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अखेर ‘या’ दिवसापासून नाशिककर होणार निर्बंधमुक्त; पालकमंत्री भुजबळ यांची माहिती

सुशील भालचंद्र पाटील (Sushil Bhalchandra Patil) (वय 33 रा. ओमकार बंगला, गितांजली को. ऑप हौसिंग सोसायटी, पंपींग स्टेशनजवळ, गंगापूर रोड, नाशिक) असे फसवणूक झालेल्या फिर्यादि तरूणाचे नाव आहे.

Nashik : रुग्णालयात राडा घालत डॉक्टर पुत्राला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद

सचिनभाई वालेरा (Sachinbhai Valera) (रा. भावकुंज सोसायटी, जोधपूर अहमदाबाद सिटी, गुजरात), वैभव गेलहोत (Vaibhav Gelhot) (रा. दडो का बस सरदारपुरा, जोधपूर), किशन कांतेलिया (Kishan Kantelia), सरदारसिंग चौहान (Sardar Singh Chouhan), प्रवीणसिंग चौहान (Praveen Singh Chouhan), सुहास माकवाल (Suhas Makwal), निरवभाई विर्माभट (Niravbhai Virmabhat), बिस्वरंजन मोहंती (Biswaranjan Mohanty), राजबीरसिंग शेखावत (Rajbir Singh Shekhawat), प्रग्येशकुमार प्रकाश (Pragyesh Kumar Prakash), संजयकुमार देसाई (Sanjay Kumar Desai), सावनकुमार पारनेर (Savankumar Parner), रिशिता शाह (Rishita Shah), विराज पांचाल (Rishita Shah) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहे.

फिर्यादि पाटील यांनी दिलेली माहिती आणि पोलिस स्थानकात दाखल गुन्ह्यानुसार, वालेरा याच्याशी फिर्यादिची 2018 मध्ये ओळख झाली. वालेरा याने आपण राज्यस्थानचे मुख्यमंत्री गेलहोत यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले. गेलहोत यांच्याशी वेळोवेळी होणार्‍या संभाषणाच्या क्लिप तसेच व्हिडीओ फिर्यादीस दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.

‘तो’ नदीत उडी मारणार तेच तरुणाने धाव घेऊन हात पकडला, पाहा नाशिकचा थरारक VIDEO

विशेष म्हणजे, फिर्यादिला भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यासाठी वालेरा हा मुख्यमंत्री कार्यालयातील फोनचा वापर करीत असे. तसेच तो काँग्रेसचा (Congress) सरचिटणीसही होता. आपण हबीक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा (Habeek Private Limited) संचालक असल्याचे त्याने सांगितले. ही कंपनी राजस्थान सरकारची जाहिराती (Rajasthan Government) तसेच ई-टॉयलेटसारख्या (Rajsthan Government E tender for Toilet) योजनांची कामे घेत असल्याचे फिर्यादिला सांगितले. या कामांमध्ये पैसे गुंतविल्यास फायदा होईल, असेही फिर्यादिला सांगितले.

मुख्यंमत्र्यांचाच निकटवर्तीय म्हटल्यावर फिर्यादिनेही या कामांमध्ये पैसे गुंतविले. सन 2018-2020 या दोन वर्षात तीन कोटी 93 लाख 54,778 रूपये आरटीजीईएसने (RTGES) संशयितांच्या खात्यावर जमा केले. तर काही रक्कम रोख दिली. असे एकूण सहा कोटी 80 लाख रूपये फिर्यादिने गुंतविले. कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव सुरू होण्याच्या नऊ महिने आधी पर्यंत वालेरा याने सांगितल्याप्रमाणे फिर्यादिला पैसे दिले देखील. त्यानंतर मात्र तो पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला.

पोलीस चौकीतील ओली पार्टी भोवली; ‘ते’ चार मद्यपी पोलीस थेट निलंबित

कोरोनामुळे देऊन बीले अडकल्याचे कारण पुढे केले. यात दीड वर्ष वाया गेले. सहा महिन्यांपासून तर वालेरा याचा भ्रमणध्वनीही बंद लागत असल्याने त्याचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे फिर्यादिचे धाबे दणाणले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहे.

महाराष्ट्राच्या ‘आमदार निवास’ मध्ये शिरली Sunny Leone

See also  20 तासांपासून हवेत लटकताहेत 48 जण; ड्रोननं अन्नपाण्याचा पुरवठा, बचावकार्य सुरु

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला 'घर-घर' लागेल असे निर्णय घेऊ नका...

Share on Social Sites