‘त्यांचे‘ वाटोळेच होईल, त्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील.. इंदुरीकर महाराजांची शापवाणी

‘त्यांचे‘ वाटोळेच होईल, त्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील.. इंदुरीकर महाराजांची शापवाणी l controversial statement of Indurikar Maharaj about YouTubers
‘त्यांचे‘ वाटोळेच होईल, त्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील.. इंदुरीकर महाराजांची शापवाणी l controversial statement of Indurikar Maharaj about YouTubers
Share on Social Sites

अकोला l Akola :

किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Kirtankar Nivruti Maharaj Indurikar) काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चांगलेच चर्चेत आले होते. अशात आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहे. यावेळी अकोल्यात (Akola) आपल्या किर्तनाच्या व्हिडिओ क्लिप काढून यूट्यूबवर (Indurikar Maharaj YouTube video) अपलोड करणाऱ्यांसाठी त्यांनी विचित्र भाषेचा उपयोग केला (Controversial Statement of Indurikar Maharaj).

Video : ED भाजपाचं ‘ATM’ बनलंय; संजय राऊतांचा घणाघात

आपल्या किर्तनाच्या व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर (YouTube) टाकणाऱ्यांना इंदुरीकर महाराज म्हणाले, की ‘अशा लोकांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल.’ या वादग्रस्त विधानानंतर आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..

अकोला शहरातील कोलखेड (Kolkhed) भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे (NCP’s district president Sangram Gawande) यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन (Indurikar Maharaj Kirtan) आयोजित केले होते. यावेळी निरुपणा करताना इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली.

इंदुरीकर महाराज यावेळी बोलताना म्हणाले, की माझ्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून कोट्यावधी रूपये कमावले.

धक्कादायक! उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा सशस्त्र दरोडा; जाता-जाता घरातील महिलांसमोर डान्स

याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणले असल्याची तक्रार इंदुरीकर महाराजांनी केली. याच कारणामुळे अशा लोकांबद्दल राग व्यक्त करत माझे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना दिव्यांग मुले होतील, त्यांचे चांगले होणार नाही, असे ते म्हणाले.

इंदुरीकर महाराज आपल्या वक्ततव्यामुळे चर्चेत आल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे ते वादात अडकले आहे. 2020 साली एका कीर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला मुलगा होतो आणि विषम तिथीला मुलगी होते, असे म्हटले होते.

त्यानंतर त्यांचे हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले. यासोबतच कोरोना (Corona) काळातही आपण लस घेतली नसून घेणारही नाही असे म्हणत त्यांनी कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा, असा सल्ला दिला होता.

ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर; प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार आता राज्य सरकारकडे

See also  आमदारांना फुकट घरं देण्याची घोषणा केल्याने तुफान गदारोळ होऊ लागल्यानंतर आव्हाडांकडून स्पष्टीकरण; म्हणाले…

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात Bird Flu चा शिरकाव

Share on Social Sites