
दुर्दैवी! दोन वेळा जीवदान… अखेर ‘त्या’ ने संपवलीच जीवनयात्रा
नाशिक l Nashik :
घरगुती वादातून एका तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्येचा (Nashik Youth Commit Suicide) प्रयत्न केल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. पण, वेळीच दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत धाव घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाचवले. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Youth Suicide Video)
Nashik : रुग्णालयात राडा घालत डॉक्टर पुत्राला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon-Baswant) परिसरात (दि. १७) दुपारी ही घटना घडली आहे. राकेश आहेर (वय 26) असे या तरुणाचे नाव आहे. राकेशने कौटुंबिक वादातून टोल नाक्या परिसरात असलेल्या कादवा नदीत (Kadva River) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिसरातून जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी वेळेत त्याला पकडून त्यास सुरक्षित घरी पोहोचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात राहणाऱ्या राकेश आहेर (Rakesh Aher) हा दुपारी कादवा नदीच्या पुलावर आला आणि मध्यभागी थांबला. बराच वेळ तिथे बसल्यानंतर राकेशने पुलावरून पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी दुचाकीवरुन कराटे प्रशिक्षक अजय जाधव (Karate Coach Ajay Jadhav) आणि त्यांचा मित्र जात होता. त्यांनी राकेशला बघितले आणि लगेच त्याच्याकडे धाव घेतली.
तो पर्यंत राकेश हा पुलाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभा राहिला होता. एक चुक जरी झाली असती तर राकेश नदीत पडला असता. पण, अजय जाधव यांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले.
(वॉच ऑन यु ट्युब या ऑपशन वर क्लिक करा! 👆)
तो उडी मारण्याच्या तयारीत होता त्याचवेळी जाधव यांच्यासोबत असलेल्या तरुणाने धाव घेऊन त्याला पकडले आणि बाहेर खेचले. त्याची विचारपूस केली तर कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर या तरुणांनी याची माहिती पिंपळगाव पोलीस ठाण्याला (Pimpalgaon Police Station) कळवली. त्यानंतर राकेशला त्याच्या कुटुंबीयाकडे सोपवण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.
अखेर ‘या’ दिवसापासून नाशिककर होणार निर्बंधमुक्त; पालकमंत्री भुजबळ यांची माहिती