
‘दोघांना’ हेल्मेट सक्ती करणारे नाशिकचे पोलिस आयुक्तांनी मागितली बदली
नाशिक । Nashik :
हेल्मेट सक्ती बाबत पोलीस आयुक्त दीपककुमार पाण्डेय (Commissioner of Police Deepak Pandey) यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा अन दुसरीकडे पालकमंत्र्यांशी पेट्रोल विक्रेत्यांच्या झालेल्या चर्चेतुन फारसे काही हाती न लागल्याने शुक्रवारी (दि. 2) गुढीपाडव्याला शहरातील पेट्रोल पंप बंद (Petrol Pump remain Closed in Nashik) असण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे.
नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेलफेअर असोसिएशनने (Nashik District Petrol Dealers Welfare Association) नाशिककरांची दिलगीरी व्यक्त करत शुक्रवारी (दि. 1) रोजी आपपल्या वाहनांमध्ये इंधन भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वाहन इंधन व्यावसायिक अनेक समस्यांचा सामना करत असतानाच आयुक्त पाण्डेय यांनी विना हेल्मेट पेट्रोल (Helmet Compulsory in Nashik) दिल्यास थेट पेट्रोल पंप चालकांवरच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्या शहरातील वाहन इंधन विक्रेते आक्रमक झाले असुन पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) विक्रीसह सीएनजी गॅस (CNG Gas) तसेच इंजिन ऑईल (Engine Oil) विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
JOB ALERT : नाशकातील ‘या’ मोठ्या कंपनीत 500हून अधिक जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती
शहरात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ (No Helmet No Patrol) या मोहिमेचा गेल्यावर्षी स्वातंत्र्य दिनाला शुभारंभ केला होता. या मोहीमेचे इंधन विक्रेत्यांकडून स्वागत करण्यात आले होते. या काळात इंधन भरण्यासाठी आलेल्या विना हेल्मेट ग्राहकांकडून पंपावरील कर्मचार्यांना मानहानी, शिवीगाळ अनेकदा मारहाणीचे देखील प्रसंग घडले.
असे असताना देखील ताण-तणाव मनस्तापावर मात करत इंधन विक्रेत्यांनी आपला पाठिंबा पोलीस प्रशासनाच्या भुमिकेला कायम दिला होता. परंतु अलिकडे पोलीस आयुक्तांनी इंधन विक्रेत्यांवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदविण्याची तयारी सुरू केल्याने इंधन विक्रेत्यांनी पोलीस प्रशासनासमोर दंड थोपटले असुन शुक्रवारी इंधन विक्री बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
शुक्रवारी (दि. 2) नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व सरकारी आणि खाजगी कंपन्यचे पेट्रोल पंप बंद राहणार असून यादिवशी डिझेल (Diesel), पेट्रोल (Petrol), सीएनजी (CNG), ऑईल (Oil), एल.पी.जी (LPG) यांची विक्री बंद राहणार आहे. (Petrol Diesel Price Hike)
यंदाचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरणाचा मान नाशिकला; राज्यपाल, मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित
शुक्रवार (दि. 1) रात्री 12 ते शनिवार (दि. 2) रात्री बारा या कालावधीत 24 तासांसाठी इंधन विक्री बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी शहरातील ऑईल कंपन्यांचे स्वत:चे आऊटलेट तसेच पोलीस अखत्यारीतील दोन पेट्रोल पंपाव्दारे इंधन पुरवठा करण्यात येईल.
: भूषण भोसले, अध्यक्ष, नाशिक पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन (Bhushan Bhosale, Nashik District Petrol Dealers Welfare Association)