मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत अल्टीमेटम, ऐकले नाही तर… राज ठाकरेंचा थेट इशारा

मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत अल्टीमेटम, ऐकले नाही तर… राज ठाकरेंचा थेट इशारा l MNS Raj Thackeray warns to removed mosque loudspeakers till May 3, 2022 Thane
मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत अल्टीमेटम, ऐकले नाही तर… राज ठाकरेंचा थेट इशारा l MNS Raj Thackeray warns to removed mosque loudspeakers till May 3, 2022 Thane
Share on Social Sites

…अन् किर्तनकार बाबाचा Porn Video असा झाला तुफान व्हायरल; खरं कारण आलं समोर

ठाणे l Thane :

येत्या ‘3 तारखेला ईद (Eid) आहे, माझी राज्य सरकारला (Maharashtra State Government), गृहखात्याला (State Home Department) विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल (Riots), तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही.

आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मे पर्यत सगळ्या मौलवींशी (Maulavee) बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे (Mosque Loudspeaker) काढून घ्या, 3 मे नंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला. (MNS Raj Thackeray Thane Sabha 2022)

https://twitter.com/ANI/status/1513910002310070272

ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray Uttarsabha) यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा मशिदीवरून आपली भूमिका स्पष्ट केली.

‘3 तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही. आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मे पर्यत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे काढून घ्या, 3 मे नंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

https://twitter.com/mnsadhikrut/status/1513925479602208770

See also  Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, मंगळवार, 30 ऑगस्ट 2022

दि. 18 जुलै 2005 चा सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आहे. कोणतेही मोठे वाद्य वाजवू नका. जर सुप्रीम कोर्टाने सांगितले असेल तर राज्य सरकारकडून अंमलबजावणी का होणार नाही. आम्ही हातावर हात ठेवून का बसायचे.

‘दंगल पेटवणारे सहसा ब्राम्हण असतात’ : सुजात आंबेडकर

जे हिंदू (Hindu) माझं भाषण ऐकत असतील तर 3 मेपर्यंत जर यांनी भोंगे उतरवले नाही तर प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावा. त्यांनाही कळू द्या त्रास काय असतो. एकमेकांना त्रास देणे हा धर्म असू शकत नाही, असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

https://twitter.com/mnsreport9/status/1513563874372427782

भोंगे काढण्यासाठी केसेस अंगावर आल्या तर घेऊ, प्रार्थना करायची तर घरात करा, सणवार असेल तर ठीक पण 365 दिवस भोंगे चालणार नाही आता फक्त हनुमान चालीसा सांगतोय, पुढचा बाण काढायला लावू नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

https://twitter.com/ANI/status/1513031760371613699

अजित पवारांना व्हिडीओ लावून सुनावले

‘अजित पवार (Ajit Pawar) यांना पठ्ठा म्हणायची सवय आहे. तुमच्या माहितीसाठी मी 3 व्हिडीओ आणले आहे. मी केव्हा काय बोललो हे मला नीट आठवतं. मी याच्याआधीही बोललो होतो. पण, त्याचे मला काही सापडले नाही. काय झालं, सकाळचा शपथविधी झाला, तो पवार साहेबांना कान काही ऐकू येत नाही. तसा त्यांना बॉम्ब फुटल्यानंतर ‘कू’ असा आवाज येत होता.

बापरे! अख्या महाराष्ट्रात 8 तास राहणार अंधार?; आता घरातही नसणार लाईट

28 जुलै 2018 रोजी मी बोललो होतो, असं म्हणत भोंग्याबद्दल व्हिडीओ चालून दाखवला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2018 रोजी बोललो होतो, त्यावेळीही मी औरंगाबादमध्ये (Aurangabad) भोंग्याची स्पर्धा सुरू आहे, त्यांना अजान (Ajaan) वाचायची असेल तर वाचा, लाऊडस्पिकर (Bonga) कशाला पाहिजे, असा व्हिडीओच लावून दाखवला. लॉकडाऊन (Lockdown) लागण्याआधी सुद्धा अधिवेशनामध्ये सुद्धा मशिदीमध्ये भोंगे सुद्धा बंद केले पाहिजे, असं बोलणार व्हिडीओ राज ठाकरेंनी भर सभेत वाजवून दाखवले.

https://twitter.com/rautsanjay61/status/1513921079172947972

See also  राज्यसभा निवडणूक 2022 : धनंजय महाडिक यांनी मैदान मारले; संजय पवार चितपट, शिवसेनेला जबर धक्का, महाविकास आघाडीची 10 मते फुटली

‘लॉकडाऊनमध्ये कान साफ झाला असेल, गुडीपाडव्याचा (Gudipadva 2022) भोंगा ऐकू आला. मी चुकीचं काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठे आला आहे. तुमची प्रार्थना, आम्हाला का ऐकवताय. भोंगे उतरवा हे नीट सांगून समजत नसेल तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे, असंही ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं. एकंदरीत आजच्या या ठाण्यातील ‘उत्तर’ सभेने राजकीय, सामाजिक वातावरणात तापणार आहे.

SBI युजर्स सावधान, एका क्लिक आणि बँक खाते होईल रिकामे; Yono SMS द्वारे होतोय नवीन Scam

See also  JEE Main Result 2022 : जेईई मेन 2022 चा निकाल जाहीर; एकूण 24 उमेदवारांना 100% गुण

Share on Social Sites