Nashik : रुग्णालयात राडा घालत डॉक्टर पुत्राला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद

Nashik : रुग्णालयात राडा घालत डॉक्टर पुत्राला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद l Doctors son beaten by youth in Hospital in Nashik Nasik
Nashik : रुग्णालयात राडा घालत डॉक्टर पुत्राला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद l Doctors son beaten by youth in Hospital in Nashik Nasik
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

शहरातील लिलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) घुसून व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (दि. 18) रोजी घडली आहे. ही घटना म्हसरूळ परिसरातील (Mhasrul area) आहे.

मारहाण झालेला डॉ. अरुण विभांडीक (Dr. Arun Vibhandik) यांचा मुलगा आहे. मारहाण आणि तोडफोड केल्यानंतर मारहाण करणारा फरार झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV Video) कैद झाली आहे. विभांडीक यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बाप रे बाप! ‘हे’ काम करून देतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या निकटर्तीयाकडून नाशकात तब्बल 6 कोटींची फसवणूक

दरम्यान, उपचारासाठी आरोपीने त्याच्या मित्राला रुग्णालयात आणले होते. मात्र, उपचार करण्यास डॉक्टरांनी विलंब केल्याने तोडफोड आणि मारहाण आरोपीने केली आहे.

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात यापूर्वी देखील अनेक डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, नाशकातील डॉक्टरांच्या मुलाला झालेल्या मारहाणीचा प्रकार धक्कादायक आहे.

‘तो’ नदीत उडी मारणार तेच तरुणाने धाव घेऊन हात पकडला, पाहा नाशिकचा थरारक VIDEO

डॉक्टरांवरील हल्यांच्या संख्येत वाढ (An increase in the number of Attacks on Doctors)

शहरातील ही मारहाणीची आताची असली तरी यापूर्वी रुग्णालयात जाऊन मारहाण केल्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाणीमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अशा प्रकारे दिवसाढवळ्या रुग्णालयात घुसून मारहाण करणे, यासारख्या घटनेमुळे पोलिसांचा वचक कमी राहिल्याचे दिसून येत आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही उभा राहतोय. तसेच अलीकडच्या काळात डॉक्टरांवरील हल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

अखेर ‘या’ दिवसापासून नाशिककर होणार निर्बंधमुक्त; पालकमंत्री भुजबळ यांची माहिती

See also  'ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोण रे तू...'; शरद पवारांना उद्देशून अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Yeola : येवल्यातील 'त्या' अफगाण धर्मगुरूच्या हत्येचा लागला छडा, चौघांपैकी एकाला अटक

Share on Social Sites