![Varsha Gaikwad ...तर अशा शाळांची मान्यता रद्द होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा l School permeation will be canceled in case of cheating in exam says Education Minister Varsha Gaikwad](https://ekhabarbat.com/wp-content/uploads/2022/03/Varsha-Gaikwad-e1647436636867-678x381.jpg)
मुंबई l Mumbai :
सध्या राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू आहे. दोन वर्षांनंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा (Offline Exam) सुरू आहे, पण यात अनेक ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ”कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल”, अशी घोषणाच वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची विधान परिषदेत (Legislative Council) केली आहे. (School permeation will be canceled in case of cheating in exam says Education Minister Varsha Gaikwad)
वर्षा गायकवाड म्हणाल्या, ”नगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फोडल्याचे प्रकरण समोर आले होते. त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. पण, यापुढे इतर कुठल्याही शाळेत पेपरफुटीचे प्रकरण (Paper leak) समोर आले, तर त्या शाळांची मान्यतादेखील काढून घेण्यात येईल. तसेच एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्रही दिले जाणार नाहीत,” अशी माहिती त्यांनी दिली.
काल दि. १५ मार्च रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण, येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले pic.twitter.com/y2RS7P6P5j
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 16, 2022
परीक्षेसंदर्भात गैरसमज न पसरवण्याचे आवाहन (Appeal not to spread misconceptions regarding exams)
”दहावीचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत, त्यामुळे परीक्षेसंदर्भात गैरसमज पसरू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच, शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात या वेळी दहावीच्या परीक्षेला (SSC Exam) मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त अधिक देण्याची विनंती आम्ही केलेली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेऊन परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत”, असे देखील वर्षा गायकवाड सभागृहात म्हणाल्या.
होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नियमावली जारी; ‘हे’ नियम पाळावेच लागतील
विद्यार्थ्यांसाठी खास सूचना (Special instructions for students)
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास आगोदर हजर राहणे गरजेचे असेल. सकाळी 10.30 चा पेपर असल्यास 9:30 वाजता तर दुपारी तीन वाजता पेपर असल्यास दोनला पोहोचावे लागेल. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करुनच परीक्षा केंद्रात (Exam Center) सोडले जाणार आहे. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे उशिरा आल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची सर्व तपासणी करुन सकाळच्या सत्रात साडेदहा पर्यंत तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
'दंगल पेटवणारे सहसा ब्राम्हण असतात' : सुजात आंबेडकर
मालेगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक; तिहेरी अपघातात रिक्षा आणि क्रूझरचा चक्काच...
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...
..अखेर डॉ. सुवर्णा वाजे यांची 'मर्डर मिस्ट्री' सॉल्व; पतीनेच थंड डोक्याने काटा क...