
वर्धा l Wardha :
दोन वर्षांपूर्वी हिंगणघाटमध्ये (Hinganghat) एकतर्फी प्रेमातून तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने (District and Additional Sessions Court) आरोपी विकेश नगराळेला (Accused Vikesh Nagarale to life imprisonment after hearing the case.) मरे पर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाची सुनावणी काल बुधवारी अर्थात दि. ९ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर अंतिम निकाल न्यायालयाने आजसाठी राखून ठेवला होता. आज न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील अँड. उज्ज्वल निकम (Advocate Ujjwal Nikam) यांनी दिली आहे.
Video : प्रतीक्षा संपली! OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन ‘या’ तारखेला होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स
“आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दि. ३ फेब्रुवारी २०१९ला त्याला अटक करण्यात आली होती. पण या दोन वर्षांच्या कालावधीची त्याला शिक्षेत सूट मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मरेपर्यंत जन्मठेप असा जन्मठेपेचा अर्थ होत असल्यामुळे आणि विकेश नगराळेच्या गुन्ह्याचं क्रौर्य पाहून त्याला २ वर्षांची सूट मिळणार नाही. शिवाय त्याला ५ हजारांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावला आहे”, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
बुधवारी हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निकाल आजसाठी राखून ठेवला होता. आज संध्याकाळी पाचच्या सुमारास या निकालाचे वाचन करण्यात आले.
नेमकं काय घडले होते त्या दिवशी?
हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात (Smt. Kunawar Women’s College) वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता दि. ०३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील (Nagpur) एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे कृत्य केल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले. या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र, ६४ सुनावणी आणि २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
आरोपीची पार्श्वभूमी काय?
आरोपीचे नाव विकेश नगराळे असे आहे. आरोपीचं लग्न झालं असून त्याला एक मुलगी देखील आहे. ही घटना घडली तेव्हा नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचे सांगण्यात आले होते. घटनेच्या तीन महिने आधी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले देखील होते. मात्र, तरी देखील आरोपी विकेश नगराळेनं पीडितेला त्रास देणं सुरूच ठेवले होते. अखेर याचं पर्यवसान ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये झाले.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Nashik Crime News : नाशिकमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल, काडतुसे, एअरगन, चॉ...
GST ची ‘रेड’... भिंतीत लपवल्या 10 कोटींच्या नोटा आणि 19 किलो चांदीच्या विटा!
IPL Auction 2022 : मेगा ऑक्शनमध्ये Unsold असलेल्या खेळाडूंचं काय होणार?
शेवटी झालंच! तब्बल 'इतक्या' आमदारांनी मविआचा पाठिंबा काढला; सरकार अल्पमतात, शिंद...