होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नियमावली जारी; ‘हे’ नियम पाळावेच लागतील

होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नियमावली जारी; 'हे' नियम पाळावेच लागतील l Maharashtra Government issue guidelines for Holi and Dhulivandan 2022 festival
होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नियमावली जारी; 'हे' नियम पाळावेच लागतील l Maharashtra Government issue guidelines for Holi and Dhulivandan 2022 festival
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणून होळी (Holi 2022) साजरी केली जाते. एकमेकांतील वैरभाव विसरून आनंदाची उधळण करण्याचा संदेश यातून दिला जात असल्याचे सांगितले जाते. देशभरात होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

फाल्गुन पौर्णिमेला (Falgun Pournima) होलिकादहन (Holikadahan) करून दुसऱ्या वर्षी धुलिवंदन केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना (Corona) संकटामुळे धुलिवंदनाच्या उत्साहावर पाणी पडल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी देखील होळी आणि धुलिवंदनासाठी (Holi and Dhulivandan) राज्य सरकारने (Maharashtra State Government) नवी नियमावली घोषित केली आहे.

होळी, धुळवड धुमधडाक्यात साजरी करा.. विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरे सरकार बॅकफूटवर

यंदाच्या वर्षी १७ मार्च रोजी होलिकादहन आणि दि. १८ मार्च रोजी धुलिवंदन आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने (Thackeray government) नवी नियमावली जाहीर केली आहे. यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले जात आहे.

हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा (Mask) वापर, सोशल डिस्टन्सिंग (Social distance) या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.

सहकार सुर्य मावळला; माजी मंत्री शंकरराव कोल्हे कालवश

होळी, धुळवडीसाठी राज्य सरकारची नवी नियमावली (New State Government Rules for Holi, Dhulivandan)

  • राज्यात सध्या दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या परीक्षा (HSC Exam) असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये.

  • सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करणे बंधनकारक असेल. रात्री १० च्या आत होळी करण्यात यावी.

  • होळीच्या सणानिमित्त (Holi) वृक्षतोड करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

  • होळी सणावेळी सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार कोणताही डीजे लावण्यास परवानगी नाही. जर कोणी डी.जेचा वापर करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

  • – सर्वसामान्य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. होळी साजरी करताना मद्यपान करून बिभत्स व उद्धट वर्तन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

  • होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची व मुलींच कोणीही छेड काढणार नाही.याबाबत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे. सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल.

  • महिलांनी परिधान केलेले दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. होळी सणानिमित्त कोठेही आगी लागतील असे कृत्य करू नये.

  • होळीच्या कार्यक्रमात कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जातील, अशा घोषणा देण्यात देऊ नये. तसेच आक्षेपार्ह फलक/बॅनर लावण्यात येऊ नयेत.

  • होळी किंवा धुलिवंदनाच्या निमित्ताने कोणीही जबरदस्ती रंग, फुगे व पाण्याच्या पिशव्या कोणाच्याही अंगावर फेकू नये.

8 बँकांवर RBI ची मोठी कारवाई! तुमचं ‘या’ ठिकाणी खातं आहे का?

See also  8 बँकांवर RBI ची मोठी कारवाई! तुमचं 'या' ठिकाणी खातं आहे का?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites