Moose Wala Murder : मूसेवाला हत्याकांडातील रेकी करणारा ‘केकडा’ अन् 8 शूटर्सची ओळख पटली, पाहा कोण आहेत?

मूसेवाला हत्याकांडातील रेकी करणारा 'केकडा' अन् 8 शूटर्सची ओळख पटली, पाहा कोण आहेत? l Sidhu Moose Wala murder case names of 8 shooters
मूसेवाला हत्याकांडातील रेकी करणारा 'केकडा' अन् 8 शूटर्सची ओळख पटली, पाहा कोण आहेत? l Sidhu Moose Wala murder case names of 8 shooters
Share on Social Sites

चंदीगड l Chandigarh :

पंजाब पोलीसांनी (Punjab Police) सोमवारी (दि. 06) सिद्धू मुसेवालांच्या (Sidhu Moosewala) हत्येमध्ये सहभागी असलेल्या आठ शूटर्स (Shooters) ओळख समोर आणली आहे. यातील दोन शूटर महाराष्ट्राचे (Maharashtra), दोन हरियाणाचे (Haryana), तीन पंजाबचे (Punjab) आणि एक राजस्थानचा (Rajasthan) आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व शूटर लॉरेन्स बिश्नोई टोळीचे (Lawrence Bishnoi gang) आहेत. या शूटर्सच्या शोधात पंजाब पोलीसांनी (Punjab Police) संबंधित राज्यांच्या पोलीसांशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली आहे. पंजाब पोलीस शूटरच्या शोधात हरियाणा-पंजाब (Haryana-Punjab), राजस्थान (Rajasthan) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) छापे टाकत आहेत.

…म्हणून ‘त्याने’ रचला उद्योजक आहेर यांचा हत्येचा कट; नाशिक पोलीस आयुक्तांनी केला खुनाचा उलगडा

मूसेवाला यांच्या हत्येनंतर आठ दिवसांनी पोलीसांनी आठ हल्लेखोरांना ओळखल्याचा दावा केला आहे. मूसेवाला यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी संदीप (Sandeep) उर्फ ​​’केकडा’ (Kekada) नावाच्या व्यक्तीला मानसा येथून अटक केली आहे. सिद्धू मुसेवालाचा चाहता म्हणून केकडानेच हे कृत्य केल्याचा पोलीसांचा दावा आहे.

पंजाब पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूसवालांच्या हत्येप्रकरणी अनेक महत्त्वाचे क्लूस मिळाले आहेत. या हत्येतील आरोपींचा शोध लागला आहे. मारेकरी कोणत्या मार्गाने आले आणि ते कसे पळून गेले? सर्व माहिती प्राप्त झाली आहे.

तरनतारन (Tarn Taran) येथील मनप्रीत मनू (Manpreet Manu) आणि जगरूपसिंग रूपा (Jagroop Singh Rupa), भटिंडातील हरकमल उर्फ ​​रानू (Harkamal, Ranu From Bathinda), सोनीपत येथील प्रियव्रत फौजी (Priyavrat Fauji, Sonipat) आणि मनजीत भोलू (Manjeet Bholu), पुणे, महाराष्ट्रातील सौरव महाकाल (Saurav Mahakal, Pune, Maharashtra) आणि संतोष जाधव (Santosh Jadhav) आणि राजस्थानमधील सीकर येथील सुभाष बानोदा (Subhash Banoda from Sikar, Rajasthan) यांचा समावेश असलेल्या शूटर्सची ओळख पटली आहे.

या सर्व शूटर्सची फोटो प्रसिद्ध झाली आहेत. याच शूटर्संनी दि. 29 मे रोजी मानसा (Mansa) येथे सिद्धू मुसेवाला यांची हत्या केल्याचा पंजाब पोलीसांना संशय आहे. हे सर्व शूटर तीन दिवसांपूर्वी कोटकपुरा महामार्गावर (Kotakpura highway) जमले होते. त्यांच्यासोबत आणखी दोन जणही होते. त्यांचीही ओळख पटवली जात आहे.

‘गेम’चा नाद लई बेक्कार! बापाच्या मृत्यु पश्चात माय माऊलीने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले

‘फॅन’ म्हणून रेकी करणारा ‘केकडा’ अटकेत

सिद्धू मुसेवालाचा फॅन बनून रेकी केल्याप्रकरणी पंजाब पोलीसांनी कालांवाली, सिरसा (Kalanwali, Sirsa) येथील संदीप उर्फ ​​केकडा (Sandeep, Kekada) याला अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, तो दोन लोकांसह सिद्धूच्या घरी गेला होता. यात त्याचा मित्र निक्कू (Nikku) आणि भटिंडाचा शूटर केशव (Shooter Keshav) यांचा समावेश होता. त्यांनी केशवला सिद्धूच्या घरापासून काही अंतरावर सोडले. त्यानंतर निक्कू आणि केकडा चाहते म्हणून मुसेवाला यांच्या घराबाहेर पोहोचले. दोघेही 45 मिनिटे येथे थांबले. चहा घेतला. सिद्धू घराबाहेर आल्यावर केकड्याने सिद्धूसोबत सेल्फी काढला आणि थारचा फोटोही काढला.

दोघांच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत. हे फुटेज हत्येच्या 15 मिनिटांपूर्वीचे आहे. परत येताना, केकड्याने निक्कू आणि केशव यांना सोडले, ते त्यांच्या इतर साथीदारांसह कोरोला कारमध्ये (Corolla car) चढले आणि त्यांची स्वतः बाईक घेऊन निघून गेले. पंजाब पोलीसांना संशय आहे की, हा केकडा मुसेवालाचा खबरी होता. या केकडयाला अमली पदार्थांचे व्यसन असल्याचे सांगितले जात असून, अंमली पदार्थांचा पुरवठा केल्याचे गुन्हेही दाखल आहेत. हा केकडा तख्तमल (Takhtmal) येथील रहिवासी असलेल्या निक्कूचा मित्र आहे. निक्कू हा गुन्हेगार आहे. त्याचे अनेक टोळ्यांशी संबंध आहेत.

तारीख पे तारीख! मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनासाठी आता ‘हा’ नवा मुहूर्त

See also  Budget 2022-23 LIVE : अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात, संपूर्ण देशवासियांचे लक्ष

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites