Video : अभी तो पार्टी शुरू हुई हैं… देशवासियांच्या दुःखाचा पाढा वाचून मोदींवर निशाणा साधणारे राहुल गांधी बारमध्ये ‘ति’च्या सोबत ‘स्पॉट’

अभी तो पार्टी शुरू हुई हैं... देशवासियांच्या दुःखाचा पाढा वाचून मोदींवर निशाणा साधणारे राहुल गांधी बारमध्ये 'ति'च्या सोबत 'स्पॉट' l Rahul Gandhi spotted partying in Kathmandu in a bar, Watch Viral Video
अभी तो पार्टी शुरू हुई हैं... देशवासियांच्या दुःखाचा पाढा वाचून मोदींवर निशाणा साधणारे राहुल गांधी बारमध्ये 'ति'च्या सोबत 'स्पॉट' l Rahul Gandhi spotted partying in Kathmandu in a bar, Watch Viral Video
Share on Social Sites

अखेर राज ठाकरेंवर ‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर अटक होणार?

नवी दिल्ली l New Delhi :

प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारला (Modi Government) घेरणाऱ्या राहुल गांधींना (Congress Rahul Gandhi) देशाची आणि आपल्या देशोधडीला लागलेल्या पक्षाची किती काळजी आहे, याचा खुलासा आता एका व्हिडिओच्या माध्यमातून झाला आहे.

या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) एका बार मध्ये पार्टी करताना दिसत आहेत. (Rahul Gandhi spotted partying in a bar) हा काठमांडू (Kathmandu) मधील लॉर्ड ऑफ ड्रिंक्स (Lord Of the Drinks, Nepal) या बारचा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Rahul Gandhi Viral Video) राहुल एका क्लबमध्ये असल्याचं दिसतं आहे.

बापरे! राज्यात दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी.. गेल्या 8 वर्षांतील उच्चांकी नोंद

याठिकाणी मोठ्या आवाजात गाणं वाजत आहे. इथे राहुल गांधींच्या शेजारी एक महिलाही आहे. राहुल गांधी त्या महिलेशी काहीतरी बोलत आहेत. याशिवाय आणखी एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी बारजवळ उभे राहून आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहेत.

राहुल गांधी काठमांडूला जाणार असल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते त्यांची मैत्रिण सुमनिमा उदास (Sumanima Udas) हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. राहुल गांधी काठमांडूच्या मॅरियट हॉटेलमध्ये (Marriott Hotel) थांबले आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सध्याच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. यासोबतच वीज टंचाई आणि इतर मुद्द्यांवर राहुल गांधींनी मोदींना घेरलं आहे.

भाजपा प्रवक्ते शाहजाद पूनावाला (BJP spokesperson Shahzad Poonawala) यांनी सांगितले की, राहुल गांधी काय करत आहेत, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र राजस्थानमधील जोधपूर येथे हिंसाचार (Jodhpur, Rajasthan violence) सुरू आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्याबाबत चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नाईट क्लबमध्ये पार्टी करत आहेत. मात्र त्यांनी भारतीय लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थांबलं पाहिजे.

काँग्रेस पक्ष संपत चालला आहे. मात्र राहुल गांधींची पार्टी अशीच सुरू राहणार आहे. ते राजकारणाबाबत गंभीर नाही आहेत. जेव्हा त्यांच्या पक्षाला आणि देशाला त्यांची गरज आहे, तेव्हा ते नेपाळमध्ये पार्टी करत आहेत.

See also  सावधान! 'The Kashmir Files' बद्दल तुम्हाला लिंक आलीय का? पोलिसांनी दिली 'हि' माहिती

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, रविवार, 21 ऑगस्ट 2022

Share on Social Sites