मुंबई l Mumbai :
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत (Shiv Sena MP and leader Sanjay Raut) आज (दि. १५) दुपारी चार वाजता मुंबईतील शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यासाठी पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) गैरवापर होत असल्याचा आरोप संजय राऊत गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहे.
याच पार्श्वभूमीवर राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या पत्रकार परिषदेसाठी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचीही तयारी शिवसेनेने केलेली दिसते. कारण नाशिकहून शिवसेनेचे (Shivsena Nashik) कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने यायला निघाले आहेत.
सौ बात की एक बात : आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर
