
औरंगाबाद l Aurangabad :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेला (Aurangabad Sabha) पोलीसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलीसांचं राज ठाकरेंच्या सभेकडे आणि त्यांच्या भाषणावर करडी नजर होती.
या प्रकरणात औरंगाबाद पोलीसांनी एक अहवाल तयार केला होता आणि तो अहवाल पोलीस महासंचालकांना (Maharashtra DGP) पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station, Aurangabad) राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलम 116, 117 आणि 153 अ, 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोड्याच वेळात औरंगाबाद पोलीसांकडून याबाबत अधिक माहिती देण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद पोलीसांनी सभेला परवानगी देताना ज्या अटी-शर्थी घातल्या होत्या त्यांचे उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1521421520530071552
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात बैठक
थोड्याच वेळापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth) यांच्यात दुपारी एक बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Chief Minister Uddhav Thackeray) भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले. यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिला.
4 तारखेपासून ऐकणार नाही, शरद पवार, भोंगे अन् बरंच काही… वाचा राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे