
प्रतिस्पर्ध्याला गुंतवून टाकणारे डावपेच आणि आपल्या पिळदार देहयष्टीने समोरच्याला घाम फोडणारा दिग्गज कुस्तीपटू स्कॉट हॉलचे वयाच्या ६३ व्या वर्षी दुखद निधन झाले. (WWE Wrestler Scott Hall passes away at age of 63)
मागील काही दिवसांपूर्वी खाली कोसळल्यामुळे त्याच्या कंबरेला (Waist) इजा झाली होती. त्यानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. यामध्येच स्कॉट हॉलची प्राणज्योत मालवली.
https://twitter.com/ShawnMichaels/status/1503558617945063428?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1503558617945063428%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.in%2Fwwe-legend-scott-hall-diet-at-the-age-63-due-to-heart-attack%2F
दि. १२ मार्च रोजी स्कॉट हॉलवर शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र स्कॉटला हृदयविकाराचे तीन झटके आले. त्यानंतर डॉक्टरांनी स्कॉटला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (Artificial Ventilation) ठेवले होते. शेवटी उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे स्कॉटचे निधन झाले.
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल आंबियाची हत्या; सामन्या दरम्यान झाडल्या गोळ्या
स्कॉटने १९९० मध्ये WWE मध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याआधी स्कॉटने NWA, AWA, WCW कुस्ती स्पर्धेत भाग घेतलेला होता. स्कॉटने सुरुवातीला डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये फक्त एका वर्षासाठी कुस्ती खेळली होती. त्यानंतर तो जपान प्रो रेस्टलिंग (Japan Pro Wrestling) आणि कॅच रेस्टलिंग असोशिएशनमध्ये (Catch Wrestling Association) कुस्ती खेळण्यासाठी गेला. हा काळ त्याने चांगलाच गाजवला.
https://twitter.com/TripleH/status/1503540999196495879?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1503540999196495879%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.in%2Fwwe-legend-scott-hall-diet-at-the-age-63-due-to-heart-attack%2F