बापरे! राज्यात दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी.. गेल्या 8 वर्षांतील उच्चांकी नोंद

बापरे! राज्यात दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी.. गेल्या 8 वर्षांतील उच्चांकी नोंद l 25 victims of Heatstroke in last two months in the Maharashtra 8 year high
बापरे! राज्यात दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी.. गेल्या 8 वर्षांतील उच्चांकी नोंद l 25 victims of Heatstroke in last two months in the Maharashtra 8 year high
Share on Social Sites

मुबंई l Mumbai :

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात उष्णतेची लाट आलेली आहे. (Heat wave in Maharashtra) राज्यातील विविध भागांतील तापमानात विक्रमी वाढ झालेली आहे. दरम्यान राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघातामुळे 25 जणांचा बळी गेला आहे, तर 374 जणांना उष्माघातची बाधा झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा औरंगाबाद येथून LIVE

गेल्या 8 वर्षातील उष्माघाताच्या बळींचा हा उच्चांक ठरला आहे. नागपूरमध्ये उष्माघाताने बळी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक असून आतापर्यंत 11 लोकांना जीव गमवावा लागला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे खासकरून विदर्भात नागरिक हैराण झाले आहेत. (25 Victims of Heat stroke in the last two months in the Maharashtra; 8 year high)

मार्च (March) महिन्यापासून राज्यातील उष्णतेचा पारा कायमच वाढत आहे. कधी उन्हाच्या झळा तर कधी अवकाळी पाऊस, यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra), विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) बऱ्याच ठिकाणी पारा 43 अंशांच्या वर पोचल्यामुळे उन्हाचे चटके असह्य झाले आहेत. विदर्भासह राजस्थान (Rajasthan) आणि मध्यप्रदेशातही (Madhya Pradesh) उष्णतेची लाट आली असून, पुढील पाच दिवस ही स्थिती कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

4 तारखेपासून ऐकणार नाही, शरद पवार, भोंगे अन् बरंच काही… वाचा राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

दरम्यान विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याची अनुभूती बुधवारी राज्यातील चाळीशीपार गेलेल्या तापमानावरून आली आहे. कोकण (Konkan) वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरी 43 अंशावर होते. विदर्भातील ब्रह्मपुरी (Brahmapuri) येथे सर्वाधिक 45.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

‘मनसे’ची माघार.. अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं ‘हे’ कारण

See also  ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा; दोन आठवड्यात निवडणुका घ्या : SC

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  भयंकर! Google वर 'कॉल गर्ल' सर्च केलं अन्..., पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का

Share on Social Sites