
नाशिक l Nashik :
आज प्रजासत्ताक दिनीच एक अतिशय धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. नाशिक (Nashik) मध्ये महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. सुवर्णा वाझे-जाधव (Dr. Suvarna Waze-Jadhav) असे त्यांचे नाव आहे. सध्या घटनास्थळावर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले आहे. त्यांनी तपास कार्य सुरू केले आहे. मात्र, अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह सापडतो काय, याबद्दल तर्कवितर्क आणि विविध चर्चांना उधाण आले आहे.
डॉ. सुवर्णा वाझे-जाधव या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. आज (दि. २६ जानेवारी) बुधवारी नाशिकमधील वाडीवऱ्हे (Vadiwarhe) परिसरातील एका वाहनात त्यांचा मृतदेह सापडला आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात की आणखी काही, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
मात्र, या घटनेने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिकची नेमकी वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आज राज्यासह नाशिकमध्ये सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. महापालिकेतही हा उत्साह होता. सारे ध्वजारोहण समारंभात व्यस्त होते.
Nashik Crime : ‘ताे’ हाडांचा सांगाडा डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच; खून झाल्याचे निष्पन्न
मात्र, काही वेळातच महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाझे-जाधव यांचा मृतदेह आढळल्याची बातमी येऊन धडकली आणि साऱ्यांनाच धक्का बसला. त्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
Trekking Accident : दगडाने केला घात; १२० फूट खोल दरीत कोसळून दोघा ट्रेकर्सचा मृत्यू, १२ जण सुखरूप