
इगतपुरी l Igatpuri :
नाते संबंधांना काळीमा फासण्याचे अनेक धक्कादायक प्रकार सातत्याने समोर येत आहेत. आता स्वतःच्या कुटुंबात सुद्धा कोणावर विश्वास ठेवणे जिकरीचे झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक (Shenvad Bk. Igatpuri, Nashik) येथे एका 28 वर्षीय विवाहित चुलतीवर चक्क पुतण्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (Igatpuri Rape Case)
इगतपुरीतील हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत नको त्या अवस्थेत आढळले 52 तरुण
पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) पुतण्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयित 22 वर्षीय पुतण्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
एसटी संप जीवावर बेतला! नाशिकमध्ये आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या
किरण वसंत दिवटे (Kiran Vasant Divate) असे या नराधमाने नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील विवाहित महिला मांजरगाव (Manjargaon) येथे विवाहाच्या पुऱ्या करण्यासाठी गेली होती.
ही संधी साधून गुरुवारी (दि. 24) रात्री 11च्या सुमारास किरण दिवटे हा पुतण्या (रा. शेणवड बुद्रुक, ता. इगतपुरी) घराबाहेर गेलेल्या पीडित चुलतीकडे गेला. चुलतीला त्याने सांगितले की, नाना (पीडित महिलेचे पती) दारू पिऊन पडले आहे. चल तुला ते कोठे पडले आहे ते दाखवतो म्हणून सोबत यायला लावले. महिलेने पुतण्यावर विश्वास ठेवत जाण्यासाठी तयार झाली. आणि इथेच तिचा विश्वासघात झाला.
https://ekhabarbat.com/kiran-pagere-as-igatpuri-trimbakeshwar-assembly-speaker-of-youth-congress/
संशयित पुतण्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधान (Indian Penal Code) संहितेचे कलम 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर (Ghoti Police Inspector Dilip Khedkar), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे (Assistant Sub-Inspector of Police Sanjay Kawade) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केदारे, गायकवाड आदी पुढील तपास करत आहे.
Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लागेल असे निर्णय घेऊ नका…