
नवी दिल्ली l New Delhi :
तेलंगणाची (Telangana) राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये (Hyderabad) एक मोठी दुर्घटना घडली आहे. भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली असून या आगीत होरपळून 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईगुडा (Bhaiguda) परिसरातील एका भंगाराच्या गोदामात अचानक आग लागली. आगीत जळालेले सर्व मजूर हे बिहारचे (Bihar) रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
काय सांगताय! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा
अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आले आहे. हैदराबादच्या सेंट्रल झोनचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. डीसीपी यांनी 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार गोदामाच्या पहिल्या मजल्यावर 12 मजूर झोपले होते. त्यावेळी तळमजल्यावर अचानक आग लागली. मजुरांना बाहेर पडण्यासाठी रस्ता हा तळमजल्यावरूनच होता. मात्र शटर बंद असल्याने ते पटकन बाहेर पडू शकले नाही.
https://twitter.com/ANI/status/1506473364931907585?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1506473364931907585%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Ftelangana-fire-bhoiguda-fire-accident-many-people-killed-alive-in-hyderabad-fire-scrap-godown-a597%2F