नाशिक l Nashik :
गेल्या दि. २६ जानेवारीला मध्यरात्री रायगडनगर (Raigadnagar, Nashik) येथे संपूर्ण भस्मसात झालेल्या कारमध्ये सापडलेला सांगाडा हा बेपत्ता डाॅ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje murder) यांचाच असल्याचे डीएनए चाचणी अहवालातून (Deoxyribonucleic acid (DNA) Test Report) निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या हाती या गूढ प्रकरणाचे महत्वाचे धागेदोरे हाती आले असून धक्कादायक बाब म्हणजे वाजे यांच्या माहेरच्या नातेवाईकांना पती संदीप वाजे यांच्यावर संशय व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाेलिसांनी संदीप वाजे यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक महानगर पालिकेच्या माेरवाडीतील श्री स्वामी समर्थ रूग्णालयाच्या (Shri Swami Samarth Hospital, Morwadi, Nashik Municipal Corporation) वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा संदीप वाजे (Dr. Suvarna Sandeep Waje) (३८, रा. कर्मयोगी नगर, गाेविंद नगरजवळ, नाशिक) या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती संदीप वाजे यांनी दि. २५ जानेवारी रोजी अंबड पाेलिस ठाण्यात (Ambad Police Station) दिली होती.
‘असा’ झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खुनाचा उलगडा; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मात्र त्याच दिवशी वाडीवाऱ्हे पाेलिस ठाण्याच्या (Wadiwarhe Police Station) हद्दीतील रायगडनगर जवळ रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनामध्ये पूर्णत: जळालेल्या अवस्थेत महिलेचा सांगाडा आढळला हाेता.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला हाेता. जळालेली कार डाॅ. वाजे यांची असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यावेळी पोलिस ठाण्यात डाॅ. वाजे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती.
डॉ. सुवर्णा या मंगळवारी (दि. २५) मोरवाडी हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या. त्यांना रात्री उशीर झाल्याने पती संदीप वाजे यांनी नातेवाइकांकडे विचारपूस केली. परंतु त्या न परतल्याने त्यांनी मध्यरात्री अंबड पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे; देशमुख यांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात एकच खळबळ
त्याच दिवशी सकाळी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत जळालेल्या कारमध्ये सापळा आढळून आला होता. चेसीज नंबरच्या आधारे ही कार डाॅ. वाजे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले होते. घटनास्थळी अधीक्षक सचिन पाटील, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक अर्जुन भोसले, वाडीवऱ्हे पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील यांनी भेट देत तपासाला गती दिली होती.
DNA चाचणी अहवाल प्राप्त : जळालेला सांगडा काेणाचा हे शाेधण्यासाठी फाॅरेन्सिक लॅबने हाडांचे नमुने घेतले होते. त्यानंतर वाजे यांच्या कुटुंबीयांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यांचा डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. हा अहवाल लवकर प्राप्त व्हावा, असे पत्र पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांनी फाॅरेन्सिक विभागाला पत्र दिले होते. ताे अहवाल काल (बुधवारी) प्राप्त झाला.
धक्कादायक! नाशिक महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ