आमदारांना फुकट घरं देण्याची घोषणा केल्याने तुफान गदारोळ होऊ लागल्यानंतर आव्हाडांकडून स्पष्टीकरण; म्हणाले…

आमदारांना फुकट घरं देण्याची घोषणा केल्याने तुफान गदारोळ होऊ लागल्यानंतर आव्हाडांकडून स्पष्टीकरण; म्हणाले… l NCP Jitendra Awhad on controversy over free MHADA houses for MLA
आमदारांना फुकट घरं देण्याची घोषणा केल्याने तुफान गदारोळ होऊ लागल्यानंतर आव्हाडांकडून स्पष्टीकरण; म्हणाले… l NCP Jitendra Awhad on controversy over free MHADA houses for MLA
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2022) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 300 आमदारांना घरे (300 Flat for MLA) बांधून देणार अशी घोषणा केली आहे. या घोषणेवरून राज्यभरात एकच चर्चा रंगली असून भाजपनेही (BJP) यावर आक्षेप घेतला आहे.

मात्र, आमदारांना मोफत घरं दिली जाणार नसून त्यांची किंमत आमदारांना आकारली जाणार आहे, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (दि. 25) गुरुवारी अधिवेशनात बोलत असताना ३०० आमदारांना मुंबईत घरं बांधून दिली जाणार आहे, अशी घोषणा केली होती.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1507237611806806025?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1507237611806806025%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fmumbai%2F300-mlas-do-not-have-free-houses-explanation-given-by-jitendra-awhad-mhss-682924.html

त्यांच्या या घोषणेनंतर राज्यभरात आमदारांना घरे का द्यावी याबद्दल तुफान उलटसुलट चर्चा रंगली होती. अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.

खुद्द आमदार साहेबांना लाजवेल अशी एक झणझणीत ‘वायरल ऑडीओ क्लिप’

‘आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतो आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे’ असे आव्हाडांनी स्पष्ट केले.

Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लागेल असे निर्णय घेऊ नका…

दरम्यान, आमदारांना घरे देण्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

‘आमदारांना कशाला घर कशाला हवे आहे. कुणी आमदार व्हायला नारळ दिला नव्हता. मी म्हणतो घर कशाला हवे. या लोकाना रोज डिप्लोमेसी करावी लागत आहेत. मुळात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आमदार फुटू नये म्हणून ही घोषणा केली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचं कारण ठरणाऱ्या Omicron BA.2 ची भारतात एन्ट्री; ही लक्षणं दिसल्यास सावध व्हा!

See also  Corona Vaccine : आता २ ते ६ वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Corona ची लस

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  दुर्दैवी!; नाशिक-नंदुरबार एसटी बसने विद्यार्थिनीला चिरडले

Share on Social Sites