कोरोना व्हायरस साथीचा (Covid19 Pandemic) प्रादुर्भाव देशात पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोनच्या नव्या व्हेरिअंटने युरोप (Europe) आणि आशियातील (Asia) अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. (Omicron new variant in India)
यावेळी कोरोना BA.2 किंवा Stealth Omicron च्या रूपात परतला आहे. दक्षिण कोरियामध्ये सर्वात वाईट स्थिती पाहायला मिळत आहे. जिथे दररोज सुमारे पाच लाख नवे रुग्ण आढळून येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization (WHO) ओमायक्रॉन बीए.2 सब व्हेरिअंट सर्वात वेगाने प्रसार होणारा व्हेरिअंट असल्याचे म्हटले आहे. आता तिसरी लाट संपल्यानंतर चीन (China), दक्षिण आफ्रिका (South Africa), हाँगकाँग (Hong Kong), ब्रिटन (Britain) सारख्या देशांमध्ये या नव्या व्हेरिअंटचा उद्रेक होऊ लागला आहे. आता या व्हेरिअंटने भारतातकी प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे.
The BA.2 sub-variant dubbed 'stealth omicron' as it presents wd fewer symptoms,driving increas caseloads in China,Hong Kong and https://t.co/umA91o6XCl does not cause more severe disease n seems antibodies fm omicron infection protect against reinfection with BA.2 @htTweets
— Vishal Singh (@VishalSBrahmpur) March 24, 2022
तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Tamil Nadu Public Health Department) जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यातील १८.४ टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन BA.2 सबव्हेरिअंट आढळून आला आहे.
Omicron BA.2 म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि भारतातील स्थिती जाणून घेणे महत्वाचे आहे. सॅम्पल जीनोमिक सिक्वेन्सिंगमध्ये (Sample Genomic Sequencing) असेही आढळून आले की, ४३ टक्के नमुन्यांमध्ये सबवेरिएंट BA.1.1 आढळून आला आहे, तर BA.1 सबव्हेरिएंट ३७.३ टक्के नमुन्यांमध्ये आढळलं आहे.
राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेतील संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग (WGS) मध्ये असं दिसून आले आहे की, राज्यातील ४९६ व्हेरिअंटपैकी 93 टक्के नमुने ओमायक्रॉन व्हेरिअंटचे होते. राज्यातील नमुन्यांपैकी ६.६ टक्के नमुने डेल्टा प्रकारातील असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे. डेल्टा हा कोरोना विषाणूचा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक प्रकार मानला जात होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे कारण डेल्टा व्हेरिअंट ठरला होता.
घाबरण्याचे कारण नाही (No reason to panic)
संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग (WGS) डेटा लोकांमध्ये कोणतीही भीती निर्माण करण्यासाठी जारी करण्यात आलेला नव्हता. तर BA.2 व्हेरिअंटबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी डेटा जारी करण्यात आला आहे. अनेक देशांमध्ये हा व्हेरिअंट झपाट्याने पसरत असल्यानं लोकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन (Health Secretary of Tamil Nadu J. Radhakrishnan) यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूच्या इतर व्हेरिअंटप्रमाणेच BA.2 व्हेरिअंट देखील श्वसन प्रणालीमध्ये सर्वाधिक प्रभावित करतो. मुख्य फरक असा आहे की, त्याची सुरुवातीची लक्षणे फुफ्फुसांशी अजिबात संबंधित नाहीत. या नवीन व्हेरिअंटबाबत केलेल्या अभ्यासानुसार, यात चक्कर येणे आणि थकवा ही दोन विशिष्ट लक्षणे आढळून आहेत. ही लक्षणे विषाणूची लागण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत जाणवू शकतात आणि ती जास्त काळ टिकू शकतात.
BA.2 व्हेरिअंटचे पचनशक्तीशी निगडीत हे 6 लक्षणे
एका रिपोर्टनुसार, स्टेल्थ ओमिक्रॉन नाकाऐवजी आतड्यांवर अधिक परिणाम करतो, ज्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे मळमळ (Nausea), जुलाब (Diarrhea), उलट्या (Vomiting), ओटीपोटात दुखणे (Abdominal Pain), उष्णतेची जळजळ (Heartburn) आणि सूज (Swelling) येणे यासारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात. या प्रकारात वास (Loss of Smell) किंवा चव कमी होणे (Loss of Taste) आणि श्वास लागणे (Shortness of Breath) यासारखी लक्षणे दिसण्याची शक्यता कमी असते.
BA.2 व्हेरिअंटची इतर लक्षणं (Other symptoms of the BA.2 variant)
-
ताप (Heat)
-
खोकला (Cough)
-
घशात खवखव (Sore throat)
-
स्नायूंचा थकवा किंवा ताणले जाणे (Muscle fatigue or tension)
-
हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे (Increased heart rate)
IPL सुरू होण्याच्या 48 तासांपूर्वी धोनीचा धमाका; CSK चं कर्णधारपद सोडलं : खास भिडूकडे सोपवलं नेतृत्व