![Temperature increased सावधान! जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला; 'अशी' घ्या काळजी l Major Temperature increases in Nashik District Nasik](https://ekhabarbat.com/wp-content/uploads/2022/03/Temperature-increased-678x381.jpg)
नाशिक । Nashik :
पहाटे गारवा, दुपारी कडक ऊन आणि रात्री ऊकाडा असा विचित्र हवामनाचा नाशिककर सध्या सामना करत असुन गुरूवारी (दि. 18) नाशिकचा कमाल तपमानाचा पारा 39.1 अंशांवर गेल्याने जुन महिन्याच्या मध्यापर्यत नाशिककरांना आणखी तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागणारे हे निश्चित झाले आहे. (Heat Wave In Nashik)
शनिवार (दि. 12) पासुन कमाल तपमानात सातत्याने वाढ होत चालली आहे. शनिवारी (दि. 12) कमाल तपमान 33.2 नोंदविल्यानंतर (Maximum Temperature) अवघ्या सात दिवसात म्हणजेच गुरूवार (दि. 18) पर्यंत कमाल तपमानात सात ते आठ अंशाची वाढ झाली.
अखेर ‘या’ दिवसापासून नाशिककर होणार निर्बंधमुक्त; पालकमंत्री भुजबळ यांची माहिती
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट असुन अनेक आस्थापनांमधील नागरिकांची वर्दळ आता कमी होऊ लागली आहे. होळी नंतर प्रामुख्याने उन्हात वाढ होत असली तरी यावर्षी मात्र होळीच्या अगोदर पासुनच कमाल तपमानात वाढ होत चालल्याने यंदाचा उन्हाळा ‘तापदायक’ ठरणार अशीच चिन्ह आहेत.
उन्हाच्या पार्श्वभुमीवर पहाटे आणि रात्रीच्या वेळी रस्ते आणि मैदानावर फेरफटका मारण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ (Scarf), टोपी (Cap) व गॉगलचा (Goggles) वापर नागरिकांकडून वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली असली तरी देखील शीतपेयांऐवजी घरगुती पारंपारिक सरबत (Limbu Sarbat) तसेच माठातील वाळेयुक्त थंड पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच वातावरणात बदल होण्यास सुरूवात झाल्यानंतर आता दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. एरवी सकाळी साडे अकराच्या सुमारास उन्हाचा चटका जाणवायचा तो आता सकाळी साडे आठ वाजेपासुनच जाणवायला सुरूवात झाली आहे.
दाभोळकरांच्या खुन्यांची ओळख पटली.. साक्षीदाराकडून महत्त्वाची साक्ष
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांकडून सकाळी अकरा वाजेच्या आतच आपली महत्वाची कामे आटोपण्याकडे कल वाढू लागला आहे तर काही लोक महत्वाच्या कामांसाठीच स्वत:ला उन्हापासुन संरक्षित करत घरातुन बाहेर पडत आहेत. संध्याकाळी सुर्य मावळती नंतर उकाड्यात आणखी वाढ होत असताना रात्री तर अनेकदा जीवाची काहीली होत असल्याची तक्रार नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.
Nashik : रुग्णालयात राडा घालत डॉक्टर पुत्राला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद
अशी घ्या काळजी…
-
वृद्ध आणि लहान मुलांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे
-
पांढरा रंग हा परावर्तित असल्याने शक्यतो सुती पांढरे कपडे परिधान करावेत
-
टोपी आणि गॉगलचा वापर करावा
-
अतिथंड पेयाऐवजी लिंबू सरबत, माठातील पाणी प्यावे
-
घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली (Water Bottle) ठेवावी
-
रसदार फळे (Juicy fruits), कलिंगड (Watermelon), शहाळे (Coconut) यामुळे अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होईल
-
आहारातील तेलकट (Oily) व मसालेदार पदार्थांचा (Spicy Food) वापर टाळावा
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Maharashtra Budget 2022 : 6 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 6 कोटी, मराठी भाषेसाठी 10...
Twitter युजर्स लक्ष द्या! 'हे' केल्यास Elon Musk सस्पेंड करणार तुमचे अकाउंट, Blu...
“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…” : अमृता फडणवीसांनी शेअर केला '१०० मार्का...
Improve Memory Tips in Marathi : तुम्हीही विसरता गोष्टी? 'स्मरणशक्ती' तीक्ष्ण कर...