Maratha Reservation : संभाजीराजेंनी उपोषण सोडलं, राज्य सरकारकडून ‘या’ मुख्य मागण्या मान्य

संभाजीराजेंनी उपोषण सोडलं, राज्य सरकारकडून या' मुख्य मागण्या मान्य l Sambhajiraje Chhatrapati protest for Maratha Reservation ends Maha Vikasaghadi agrees following terms
संभाजीराजेंनी उपोषण सोडलं, राज्य सरकारकडून या' मुख्य मागण्या मान्य l Sambhajiraje Chhatrapati protest for Maratha Reservation ends Maha Vikasaghadi agrees following terms
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी आज (दि. २८) उपोषण मागे घेतले. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण (Sambhaji Chhatrapati Hunger Strike) मागे घेतले.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (State Urban Development Minister Eknath Shinde), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (Culture Minister Amit Deshmukh) यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात (Azad Maidan) भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिले.

तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत. काहीच ठेवायचे नाही असा निर्णयच सरकारने घेतला असून या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.

यशवंत जाधवांची ‘मॅरेथॉन चौकशी’ संपली; 100 तासांनंतर घरातून निघाले IT अधिकारी

मराठा समाजाच्या खालील मागण्या झाल्या मान्य

  1. मराठा समाजातील उमेदवारांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार.

  2. सार्थीचं व्हीजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत याची पूर्तता करणार.

  3. सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.

  4. सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रीमंडळासमोर ठेवणार.

  5. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार.

  6. व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत, असं शिंदे यांनी सांगितलं.

See also  वाढदिवसाच्‍या पार्टीने केला घात.. दोघांचा जागीच मृत्यू; खान्देशातील घटना

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  खळबळजनक! पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, 'रुबी'च्या 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Share on Social Sites