Russia-Ukraine War : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण l Beating with Indian students in Ukraine Poland border amid war with Russia
धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण l Beating with Indian students in Ukraine Poland border amid war with Russia
Share on Social Sites

Kyiv l कीव :

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine war) पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. युक्रेनमधून पोलंडमध्ये (Poland) स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाली आहे.

याबाबत पीडित विद्यार्थ्यांना आलेल्या ह्रदयद्रावक अनुभव माध्यमांना सांगितले आहेत. युक्रेन-पोलंड सीमेवर युक्रेनच्या सुरक्षा रक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना प्रवेश दिला आणि भारतीयांना बाजूला काढून मुले आणि मुली न पाहता लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकारही समोर आला आहे.

साक्षी इजनकर या विद्यार्थीनीने एका मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले, “आम्ही जेव्हा युक्रेन-पोलंड सीमेवर आलो तेव्हा आम्हाला सुरक्षा रक्षकांनी घेरले होते. आम्हाला प्रवेशद्वारावर प्रवेश देण्यात आला नाही. तेथून केवळ युक्रेनच्या नागरिकांना पोलंडमध्ये प्रवेश दिला जात होता. खूप विनवण्या केल्यानंतर केवळ भारतीय मुलींना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी भारतीय मुलांना बेदम मारहाण केली.”

“अस्थमाचा त्रास असणाऱ्यांचाही छळ”

“पोलिसांनी मारहाणीसोबतच मुलांचा छळही केला. ज्यांना अस्थमाचा त्रास होता त्यांना मारहाण करून त्यांना कसा श्वास घेता येत नाही असं दाखवले. यानंतर रात्री ११ ते १२ च्या दरम्यान मारहाण केल्यानंतर प्रवेश देण्यात आला. आम्ही खूपच घाबरलो होतो. पोलंडमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे ४ रांगा गेल्या. नंतर त्यांना ३ रांगा हव्या होत्या, तर त्यांनी पुन्हा बंदुका घेऊन मारहाण केली,” असे या विद्यार्थीनीने सांगितले.

“आतमध्ये गेल्यावर व्हिसाबाबत हंटर गेम (Hunter game) खेळायचा होता. तो काय खेळ असतो ते मला माहिती नव्हते. तिथे गेल्यावर ते रॉड आणि बंदुका घेऊन उभे होते. हा खेळ खेळल्यावर तुम्हाला व्हिसा मिळेल असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलगा आहे की मुलगी हेही पाहिले नाही,” असेही साक्षी इजनकरने नमूद केले.

एकूणच युद्धाच्या छायेतील युक्रेनमधून अनेक लोक शेजारी देशांचा आसरा घेत सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत आहेत. यात भारतीयांचाही समावेश आहे. मात्र, युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये जाताना भारतीयांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहे. आधी युक्रेनच्या नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे. भारतीयांना प्रवेश दिला जात नाही, अशी तक्रार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन सीमेवर नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहे.

See also  निसर्ग कोपला रं! भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 55 जवान ढिगाऱ्याखाली अडकले, मृतांचा आकडा 7 वर

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  तुमची मुले देखील Kinder Joy खातात का?, मग ही बातमी तुमच्यासाठी, तक्रारीनंतर कंपनीने घेतला 'हा' मोठा निर्णय

Share on Social Sites